न्यूयॉर्क (New York boat accident) : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शनिवार दि. ८ ऑगस्ट रात्री मोठी दुर्घटना घडली. न्यूयॉर्कच्या लिबर्टी आयलंड आणि न्यूयॉर्क हार्बर परिसरात २२ फूट लांबीची बोराइडर मोटरबोट उलटल्याने एका महिला आणि पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे १०:३० वाजता बोट उलटल्याची माहिती न्यूयॉर्क सिटी फायर डिपार्टमेंटला मिळाली. बोट उलटल्यानंतर अनेक प्रवासी पाण्यात पडल्याचे समोर येताच FDNY आणि NYPD च्या पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. (New York boat accident)
घटनेची माहिती मिळताच NYPDच्या हार्बर युनिट्स, स्कूबा डायव्हिंग पथक आणि एव्हिएशन युनिट्स घटनास्थळी दाखल झाले. गोताखोरांनी पाण्यात उतरून शोधमोहीम राबवत, प्रवाशांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. (New York boat accident)
काही प्रवासी गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ दुखापत झालेल्या अन्य १२ प्रवास्यांनाही उपचारासाठी परिसरातील विविध रुग्णालयांत नेण्यात आले.
BREAKING: A 5-month-old baby and a woman have died after a boat overturned near the Statue of Liberty late Saturday night.
About 12 of the 14 people on board were pulled from the water by rescuers. The infant and woman were recovered by divers, airlifted to a Brooklyn hospital… pic.twitter.com/R5iII8HXuw
— Oliya Scootercaster 🛴 (@ScooterCasterNY) August 9, 2026
महिला आणि चिमुकल्या बाळाचा मृत्यू
गंभीर अवस्थेतील दोन जणांना NYU लैंगोन हेल्थ ब्रुकलिन येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. (New York boat accident)
बोट नेमकी का उलटली? तपास सुरू
अपघातग्रस्त बोट २२ फूट लांबीची बोराइडर मोटरबोट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र बोट नेमकी कोणत्या कारणामुळे उलटली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (New York boat accident)
यूएस कोस्ट गार्डकडून या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. बोटीचा वेग, हवामान, पाण्याची स्थिती, बोटीतील प्रवाशांची संख्या आणि दुर्घटनेपूर्वी नेमके काय घडले, याचा तपास केला जाणार आहे.
न्यूयॉर्क हार्बर हा पर्यटन आणि बोटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा परिसर आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर जलवाहतूक सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (New York boat accident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.