महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून यशाची नवी उंची गाठावी : अमीत साटम

    09-Aug-2026   
Ameet Satam Mumbai Municipal School Visit
 
मुंबई : (Ameet Satam Mumbai Municipal School Visit) समता परिषद, मुंबईतर्फे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून एसएससी परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी, "महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या बळावर यशाची नवी उंची गाठावी. गुणवत्तेला प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन केले.(Ameet Satam Mumbai Municipal School Visit)
 
समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी आपल्या मनोगतात, "महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत मोठे यश संपादन करू शकतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा उपक्रम आहे," असे सांगितले.(Ameet Satam Mumbai Municipal School Visit)
 
या कार्यक्रमाला समता परिषद, मुंबईचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस संजय आढांगळे, उपाध्यक्ष शरद कांबळे, शिक्षण विभाग प्रमुख विजय (भाऊ) पवार, उदय पडेलकर, सुभाष कांबळे, सिद्धार्थ सकपाळ आणि देवदत्त तांबे यांच्यासह भाजपा मुंबईचे महामंत्री राजेश शिरवडकर, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर आणि मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे उपस्थित होत्या.(Ameet Satam Mumbai Municipal School Visit)
 
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समता परिषद सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.(Ameet Satam Mumbai Municipal School Visit)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर