आरोग्य सुविधांचा विस्तार ही काळाची गरज - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

    09-Aug-2026
Health Minister Prakash Abitkar
 
मुंबई : (Health Minister Prakash Abitkar) "आरोग्य सुविधांचा विस्तार ही काळाची गरज असून राज्यातील नागरिक, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे." असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
 
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सह राज्यातील १० नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत शल्यक्रिया विभाग आणि नवजात शिशु अतीव दक्षता विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.(Health Minister Prakash Abitkar)
 
आमदार सीमाताई हिरे यांनी दूरदृष्टी संवाद प्रणाली द्वारे तर आमदार चित्रा वाघ यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक अशोक थोरात यांनी प्रास्ताविक करून नव्या विभागांची माहिती दिली. या सोहळ्याचे ऑनलाइन उद्घाटन वरळी, कांदिवली, मुलुंड, वाशी, पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णालयांशी जोडून करण्यात आले. कार्यक्रमास राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, नगरसेवक किरण प्रभाकर तावडे तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Health Minister Prakash Abitkar)
 
यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, "आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून ती समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळाली पाहिजे. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच निरोगी समाजाची उभारणी शक्य आहे."(Health Minister Prakash Abitkar)
 
ते पुढे म्हणाले की, " नवजात बालकांना तातडीचे आणि गुणवत्तापूर्ण उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील.तसेच उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर राज्यातील सर्व रुग्णालयातील सर्व माहिती १५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे."(Health Minister Prakash Abitkar)
 
विविध विभाग, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक करत ,समाजहितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास आरोग्य क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, असे प्रतिपादन करत त्यांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचेही आभार मानले.(Health Minister Prakash Abitkar)
 




संबंधित मजकूर