कोल्हापूर : (CPR Hospital Modernization) पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचे लोकार्पण रविवार दि.९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले. (CPR Hospital Modernization)
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सीपीआर रुग्णालयाच्या ऐतिहासिक वाटचालीसह नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. तसेच रुग्णालयाची प्रतिमा मान्यवरांना भेट देण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराज आणि राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. (CPR Hospital Modernization)
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदी उपस्थित होते. (CPR Hospital Modernization)
या नूतनीकरणामध्ये रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान, मॉड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, एमआरआय विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड, तसेच विविध वैद्यकीय विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातील आरोग्यसेवांची क्षमता आणि गुणवत्ता अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. (CPR Hospital Modernization)
याशिवाय, रुग्णालयातील विविध इमारतींची दुरुस्ती, रस्ते व परिसर विकास, विद्युत व्यवस्था, फर्निचर, विविध विभागांचे बांधकाम व आधुनिकीकरण, ट्रॉमा केअर सेंटर, अत्याधुनिक ऑपरेशन सुविधा, तसेच विविध मॉड्युलर कामे करण्यात आली आहेत. (CPR Hospital Modernization)
छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रकल्पात प्रत्येकी १०२ सदनिकांच्या १८ मजली दोन इमारती अशा २०४ निवासस्थानांचा समावेश आहे. ७१ कोटी २८ लाख रुपये किंमतीचा हा प्रकल्प असून एकूण बांधकाम क्षेत्र २४ हजार १०१ चौरस मीटर आहे. इमारतीच्या छतावर सौर विद्युत प्रणाली उभारण्यात आली असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अग्निशामक प्रणाली आदी समाविष्ट आहेत. (CPR Hospital Modernization)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले - :
यात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण.
राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आर्ट गॅलरी व कलादालन उभारणी.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे एस्ट्रोटर्फ उभारणी
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बहुमजली पार्किंग इमारत व भक्तनिवास पहिला टप्पा
स्टेशन रोड वरील मल्टी लेव्हल कार पार्किंग
रंकाळा तलावातील म्युझिकल फाऊंटन
दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात येणारा एम आर डी पी प्रकल्प
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारतीची पुनर्बांधणी