मुंबई : (DY Patil) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यपाल दिवंगत डॉ. डी.वाय.पाटील यांच्या कुटुंबीयांची कोल्हापूर येथे रविवार दि.९ रोजी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉ. डी वाय पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.(DY Patil)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,"जुन्या पिढीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव होते. आयुष्यातील संघर्षातून त्यांनी शिक्षण,सहकार, उद्योग यासह विविध क्षेत्रात एक मोठे कार्य उभे केले.त्यांच्या कार्याने सामान्य माणसाला दिलासा दिला.राज्यपाल म्हणून तीन राज्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली.प्रत्येक कामाचा एक ठसा त्यांनी उमटवला आहे. सर्व पक्षात त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांना कधीही भेटले तर त्यातून नवीन विचार मिळायचा."(DY Patil)
यावेळी दिवंगत डॉ. डी वाय पाटील यांचे सुपुत्र आमदार सतेज पाटील, संजय पाटील, नातू माजी आमदार ऋतुराज पाटील यांसह पाटील कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.(DY Patil)