सणासुदीच्या खरेदीत सावधान! काजूकतलीत चक्क अळ्या; FDAची मॉलवर धाड

    09-Aug-2026

बुलढाणा: (Buldhana Mall Kajukatli Insects Fungus Found)
सणासुदीच्या तोंडावर बुलढाणा शहरात ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा एक संतापजनक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील नामांकित मॉलमधून खरेदी केलेल्या 'सीताश्री-लक्ष्मीनारायण' कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ब्रँडेड मिठाईच्या नावाखाली ग्राहकांना थेट दूषित अन्न विकले जात असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. (Buldhana Mall Kajukatli Insects Fungus Found)

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील एका ग्राहकाने रिलायन्स मॉलमधून 'सीताश्री-लक्ष्मीनारायण' कंपनीचा काजूकतलीचा बॉक्स खरेदी केला होता. घरी जाऊन बॉक्स उघडला असता काजूकतलीवर मोठ्या प्रमाणावर बुरशी साचलेली आढळली आणि त्यावर जिवंत अळ्या वळवळताना दिसल्या. संबंधित दूषित मिठाईच्या उत्पादनावरील बॅच/बारकोड क्रमांक 8906151422017 असा आहे. हा प्रकार निदर्शनास येताच ग्राहकाने वेळ न दवडता तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल केली. (Buldhana Mall Kajukatli Insects Fungus Found)

एफडीए पथकाची मॉलवर थेट धाड

तक्रारीची तात्काळ दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जि. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या (FDA) पथकाने बुलढाण्यातील मॉलवर थेट धाड टाकली. पथकाने घटनास्थळी जाऊन दूषित काजूकतलीसह मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या संपूर्ण मिठाईच्या साठ्याची पाहणी केली व नमुने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले नमुने पुढील रासायनिक व जैविक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. तसेच मॉल मधील इतर खाद्यपदार्थांच्या साठ्याचीही तपासणी केली जात आहे. (Buldhana Mall Kajukatli Insects Fungus Found)

ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मोठमोठे मॉल्स आणि नामांकित ब्रँड्सवर नागरिक विश्वासाने खरेदी करतात. मात्र, अशा प्रकारे दूषित आणि आरोग्यास धोकादायक असणारे अन्नपदार्थ विकले जात असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्काळजीपणाबद्दल एफडीए प्रशासन मॉल आणि उत्पादक कंपनीवर काय कडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Buldhana Mall Kajukatli Insects Fungus Found)






संबंधित मजकूर