बारामती विमानतळावर शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरले! दोन्ही वैमानिक सुरक्षित...

    09-Aug-2026

बारामती: (Baramati Training Aircraft accident) पुण्यातील बारामती विमानतळावर रविवारी दुपारी पुन्हा एकदा दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामती विमानतळ परिसरात प्रशिक्षण सरावादरम्यान कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे एक शिकाऊ विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने या घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Baramati Training Aircraft accident)

सुदैवाने दोन्ही वैमानिक बचावले

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ च्या सुमारास कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाचा ताबा सुटला आणि ते रनवेच्या बाहेर घसरले. (Baramati Training Aircraft accident)

कॅप्टन: चिराग शशिकांत डोईफोडे

कॅडेट: अभिजीत जुंद्रे


हे दोघेही पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Baramati Training Aircraft accident)


हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

याच वर्षी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंग करताना झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बारामती आणि परिसरात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे शिकाऊ विमानांच्या हवाई सुरक्षेबाबत नागरिक आणि तज्ज्ञांकडून पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Baramati Training Aircraft accident)






संबंधित मजकूर