शिवसेना क्रीडा सेनेतर्फे सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचे आयोजन

    07-Aug-2026
Shiv Sena Blood Donation
 
मुंबई : (Shiv Sena Blood Donation) शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना क्रीडा सेनेतर्फे “सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रक्तदान यात्रा दिल्ली येथे पार पडणार आहे. या यात्रेनिमित्त विशेष रेल्वे गुरुवार दि.५ रोजी सांगली रेल्वे स्थानकातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून दिल्लीकडे मार्गस्थ झाली. (Shiv Sena Blood Donation)
 
"देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता, गरज पडल्यास रक्ताचा तुटवडा भासू नये या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेली ही महारक्तदान यात्रा समाजात राष्ट्रभक्ती, सेवाभाव आणि रक्तदानाचे महत्त्व अधिक दृढ करणारी ठरणार आहे." अशी प्रतिक्रिया यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. (Shiv Sena Blood Donation)
 
यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदान चळवळीशी निगडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shiv Sena Blood Donation)
 
 




संबंधित मजकूर