नवी दिल्ली: (Delhi Marathi Film Festival 2026 )मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि तिचे आधुनिक प्रयोगशील रूप राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी देशाच्या राजधानीत पहिल्या 'दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील जनपथ येथील प्रतिष्ठित डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे हा ३ दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडत आहे. हा महोत्सव दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. अ-मराठी प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटसृष्टीची ताकद अनुभवता यावी, यासाठी महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स पुरवले जात आहेत. (Delhi Marathi Film Festival 2026 )
उद्घाटन आणि प्रमुख चित्रपटांची रेलचेलमहोत्सावाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या शानदार उद्घाटन सोहळ्याने झाली. या महोत्सवाचा उद्घाटनपट म्हणून बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला 'देऊळ बंद २' हा चित्रपट दाखवण्यात आला, ज्याच्या शोच्या वेळी कलाकारांशी थेट संवादाचे सत्रही आयोजित केले गेले. (Delhi Marathi Film Festival 2026 )
महोत्सव काळात २५ हून अधिक फीचर फिल्म्स, लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन केले जात असून त्यात खालील प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे: (Delhi Marathi Film Festival 2026 )
स्थळ : ग्रामीण भागातील विवाह संस्था आणि स्त्री-दृष्टिकोन मांडणारा, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला जयंत दिगंबर सोमळकर दिग्दर्शित हा चित्रपट महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. (Delhi Marathi Film Festival 2026 )
सामना: डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित आणि डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाने सजलेला मराठी सिनेसृष्टीतील क्लासिक चित्रपट 'सामना' चे विशेष प्रदर्शन.इतर प्रमुख चित्रपट: महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित
'सत्यशोधक', 'तुंबाडची मंजुळा', 'फुलवंती', 'घबडकुंड', 'गांधी टॉक्स', 'उत्तर', 'आशा' आणि 'मामाच्या गोव्याला जाऊया'. (Delhi Marathi Film Festival 2026 )