‘एटीएम’मधून एटीएम/डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याची सोय बहुतांशी बँकांनी ग्राहकांनी उपलब्ध करुन दिली आहे. मोबाईल आणि ‘यूपीआय’च्या माध्यमातून ही सोय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना आता एटीएममध्ये जाताना कार्ड नेण्याचीही आवश्यकता भासत नाही. तेव्हा, नेमकी ही ‘कार्डलेस एटीएम’ची यंत्रणा, त्याचे फायदे यांचा आढावा घेणारा हा लेख...
आपल्या देशाने डिजिटल क्रांतीच्या प्रक्रियेत एक ऐतिहासिक पाऊल टाकले. आता ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी एटीएम/डेबिट कार्डची गरज नाही. मोबाईल आणि ‘यूपीआय’च्या साहाय्याने कार्डशिवाय थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतात. ही सुविधा म्हणजे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताने जगाला ‘यूपीआय’च्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांचे एक अद्वितीय मॉडेल दिले. ‘यूपीआय’ने अगदी चप्पलला चुक मारणार्यापासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत सर्वत्र व्यवहारांची पद्धत बदलून टाकली. आता त्याच ‘यूपीआय’चा वापर करून ‘एटीएम’मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित सुलभ व सर्वसमावेशक होईल.
‘कार्डलेस एटीएम’ म्हणजे अशी यंत्रणा, ज्यात ग्राहकांना पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’ कार्ड मशीनमध्ये घालावे लागत नाही. ग्राहक आपल्या मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅपने ‘एटीएम’शी संवाद साधू शकतो. नंतर काही सेकंदांमध्ये रोख रक्कम घेऊ शकतो. यामुळे कार्ड बाळगण्याची, फसवणुकीची धास्ती राहात नाही. ही पद्धती खरंच सोपी आहे. ग्राहक ‘एटीएम’मध्ये रोख रक्कम काढण्याचा पर्याय निवडू शकतो. त्यानंतर आवश्यक रक्कम नमूद करू शकतो. ‘एटीएम’ मशीन लगेच एक विशेष क्यूआर कोड तयार करते. ग्राहक आपल्या मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅप उघडून हा कोड स्कॅन करू शकतो. त्यानंतर ‘यूपीआय’ पासवर्ड टाकून व्यवहाराला मंजुरी देतो. काही क्षणांमध्ये ‘एटीएम’मधून रोख रक्कम बाहेर येते. संपूर्ण प्रक्रियेत कार्डचा वापर होत नाही आणि कोणत्याही अतिरिक्त उपकरणाची गरज भासत नाही. सामान्य नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरते. सध्या बहुतेक लोक स्मार्टफोन वापरतात आणि त्यात ‘यूपीआय’ अॅप असते. त्यामुळे मोबाईलने पैसे काढता येऊ शकतात. सध्याच्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा नक्कीच चांगली आहे.
गेल्या काही वर्षांना ‘एटीएम स्किमिंग’, ‘कार्ड क्लोनिंग’ आणि डेटाचोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही गुन्हेगारांनी ‘एटीएम’मध्ये गुप्त उपकरणे बसवून कार्डची माहिती चोरली आणि त्यातून बनावट कार्ड तयार केली. परिणामी, ग्राहकांच्या खात्यातील पैसे लुटले गेले. कार्डलेस व्यवहारांमध्ये कार्डचा वापरच नसल्यामुळे असे गुन्हे होण्यास प्रतिबंध निर्माण होतो व बँकिंग व्यवहार सुरक्षित होतात. सध्या देशातील लाखो नागरिक ‘यूपीआय’चा वापर करतात; परंतु अनेकांकडे ‘एटीएम’ कार्ड नसते किंवा ते वापरण्याची सोय नसते. मोबाईलच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे डिजिटल व्यवहार आणि पारंपरिक रोख व्यवहार यांच्यातील दरी कमी होते. ग्रामीण भागातील नागरिक अधिक आत्मविश्वासाने बँकिंग सेवा वापरू शकतील. ज्येष्ठ नागरिकांसाठीही कार्डलेस ‘एटीएम’ सोयीस्कर आहे. काहींना वयोमानानुसार, ‘एटीएम’ कार्ड हाताळणे, कार्डचा पासवर्ड लक्षात ठेवणे किंवा मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे जमत नाही. त्यावरून त्यांना ‘यूपीआय’ अॅप वापरणे सोपे वाटू शकते.
एकापेक्षा जास्त खाती असलेल्या ग्राहकांसाठीही ही सुविधा चांगली आहे. अनेक कार्ड बाळगण्याची गरज नाही. अॅपला सर्व खाती लिंक करून, हव्या त्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतील. सर्व बँका सर्व ‘यूपीआय’ अॅप्स आणि सर्वसामान्य नागरिक यांना जोडणारी ही एक सार्वत्रिक आणि परस्परसंवादी व्यवस्था विकसित केली आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेचा ग्राहक कोणत्याही ‘एटीएम’वर जाऊन ‘यूपीआय’द्वारे पैसे काढू शकतो. आपल्या देशात ‘यूपीआय’ व्यवहारांची संख्या प्रचंड असून वापरही व्यापक आहे. बँकिंग सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे सर्व विकसित अर्थव्यवस्थांचे ध्येय असते. डिजिटल साधनांच्या मदतीने नागरिकांना अधिक सक्षम करणे आणि त्यांना वित्तीय प्रणालींशी जोडणे, हे या तंत्रज्ञानामुळे अधिक सोपे झाले आहे. सर्व थरांतील लोकांना याचा फायदा व्हायला हवा.
‘एनटीटी डेटा’तर्फे एकीकृत सेवाब्रॅण्ड
भारताची डिजिटल कॉमर्स इकोसिस्टम जसजशी विस्तारत आहे, तसतसे व्यापारी आणि उद्योग एकाच व्यासपीठावर पेमेंटस् कॉमर्स आणि व्यवसायकार्ये एकत्र करणारे एकात्मिक उपाय शोधत आहेत. या बदलाला प्रतिसाद देत, ‘एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडिया’च्यावतीने नुकताच ’ADAPTIS’ हा त्याचा पेमेंट आणि कॉमर्स उपायांसाठीचा एकीकृत सेवाब्रॅण्ड सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या लॉन्चमुळे ‘एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडिया’ची पेमेंट स्वीकृती, मर्चंट सोल्यूशन्स व्हॅल्यू, अॅडेड सर्व्हिसेस आणि कॉमर्स क्षमता एकाच ब्रॅण्डखाली आली आहे.
स्थानिक व्यापार्यांपासून आणि वाढत्या ‘एमएसएमई’ ते मोठ्या उद्योगांपर्यंतच्या व्यवसायांसाठी डिझाईन केलेले ’ADAPTIS’ व्यापार्यांना देयके स्वीकारणे, कामकाज सुव्यवस्थित करणे, ऑनलाईन आणि ऑफलाईन वाहिन्यांद्वारे ग्राहकांना सुरळीत अनुभव देणे आणि एका एकात्मिक मंचाद्वारे त्यांचा संपूर्ण वाणिज्य प्रवास व्यवस्थापित करण्यास सक्षम करते. ‘एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडिया’चे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ ताकेओ उएनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारत ही आमच्या प्रादेशिक विकास धोरणातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे, जी मजबूत डिजिटल स्वीकार आणि व्यापार्यांच्या बदलत्या गरजांमुळे प्रेरित आहे. ’ADAPTIS’सह आम्ही सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी सुरक्षित चालना देणार्या आणि ग्राहककेंद्रित कॉमर्ससंबंधी उपाय उपलब्ध करण्यासाठी सखोल स्थानिक बाजारपेठेच्या समजुतीसह आमचे जागतिक कौशल्य एकत्रित करीत आहोत. हे सादरीकरण आमच्या व्यापारी व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी, इकोसिस्टममधील भागीदारी बळकट करण्यासाठी आणि भारताच्या ‘डिजिटल पेमेंट लॅण्डस्केप’च्या निरंतर वाढीस पाठिंबा देण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला बळकटी देतो.”
भारतात ’ADAPTIS’चा शुभारंभ हा जपानमधील बाजारपेठांमध्ये एकीकृत पेमेंट्स आणि कॉमर्स मंच तयार करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा आहे. जपानी कंपन्यांच्या क्षमतांना एकाच ब्रॅण्डखाली आणून त्यांच्या प्रत्येक स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिकता राखून व्यापार्यांंना सातत्यपूर्ण उच्च दर्जाचे अनुभव त्यांना द्यायचे आहेत.
दीर्घकालीन शाश्वत वाढीसाठी ‘एनटीटी डेटा’चा व्यवसाय बळकट करण्यासाठी ’ADAPTIS’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कंपनीला भारतातील व्यापार्यांच्या बदलत्या गरजांना पाठिंबा देताना या कंपनीच्या भागीदारांना अधिक मूल्य देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.
भारतात ’ADAPTIS’च्या चार प्रमुख सेवा आहेत. इनस्टोअर, ई-कॉमर्स, एन्टरप्राईझ व ‘व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस.’ भारताच्या देयक क्षेत्रातील सुमारे दोन दशकांच्या अनुभवासह ‘एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडिया’