मुंबई : (All The Best Marathi Play )मराठी रंगभूमीवर गेली तब्बल ३३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे, अनामय प्रॉडक्शन्स निर्मित आणि ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित अजरामर विनोदी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ आता अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला सज्ज झाले आहे. या भव्य अमेरिका दौऱ्यात नाटकाचे १७ प्रयोग विविध शहरांमध्ये सादर करण्यात येणार असून, मराठी रंगभूमीसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.. (All The Best Marathi Play )
सध्या महाराष्ट्रभर ‘ऑल दि बेस्ट’चे प्रयोग प्रचंड उत्साहात आणि हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरू आहेत. मयुरेश पेम, जुई बेंडखळे, निखिल चव्हाण आणि मनमित पेम यांच्या उत्स्फूर्त आणि दमदार अभिनयामुळे प्रत्येक प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे. (All The Best Marathi Play )
या यशात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे अमेरिकेतील प्रतिष्ठित बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) यांच्या जगभर लोकप्रिय असलेल्या अधिवेशनात ‘ऑल दि बेस्ट’ची झालेली निवड. जगभरातील मराठी रसिकांना एकत्र आणणाऱ्या या प्रतिष्ठित व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळणे ही अनामय प्रॉडक्शन्स आणि संपूर्ण कलाकार-तंत्रज्ञ टीमसाठी मोठा सन्मान आहे. (All The Best Marathi Play )
७ ऑगस्ट- सिएटल (BMM), ८ ऑगस्ट - बे एरिया , ९ ऑगस्ट - ह्यूस्टन , १४ ऑगस्ट- बोस्टन ,१५ ऑगस्ट - डेट्रॉईट , १६ ऑगस्ट - शिकागो , १९ ऑगस्ट - पिट्सबर्ग ,२१ ऑगस्ट - टॅम्पा बे , २२ ऑगस्ट- अटलांटा , २३ ऑगस्ट - डॅलस , २७ ऑगस्ट -सेंट लुईस , २८ ऑगस्ट - रॅले , २९ ऑगस्ट - मिनियापोलिस , ३० ऑगस्ट - न्यू जर्सी , ४ सप्टेंबर- रिचमंड ,५ सप्टेंबर - कनेक्टिकट या ठिकाणी हे शोज होणार आहेत. (All The Best Marathi Play )
मराठी भाषा, संस्कृती आणि नाट्यपरंपरेचे वैभव सातासमुद्रापार पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा हा अमेरिका दौरा केवळ एका नाटकाचा प्रवास नसून, मराठी रंगभूमीच्या जागतिक यशाचा नवा अध्याय ठरणार आहे. (All The Best Marathi Play )