SIR मोहिमेत तुमचे नाव 'या' ५ श्रेणीत आहे का? मतदार यादी ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


नवी दिल्ली: (Karnataka SIR Voter List Check Online) कर्नाटक निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १ कोटीहून अधिक मतदारांच्या नोंदींबाबत शंका किंवा विसंगती आढळल्याने त्यांची नावे विशेष ५ श्रेणींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये नाव आल्यास घाबरण्याचे कारण नाही, तर ऑनलाइन पद्धतीने मतदार यादी तपासून नाव दुरुस्त करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. (Karnataka SIR Voter List Check Online)

काय आहे 'ASDDO' मधील ५ श्रेणींचा अर्थ?

१. अब्सेंट (Absent): बीएलओ (BLO) च्या पडताळणीवेळी मतदार घरी उपस्थित नव्हता.

२. शिफ्टेड (Shifted): मतदाराने त्या पत्त्यावरून कायमचे स्थलांतर केले आहे.

३. डुप्लिकेट (Duplicate): एकाच मतदाराची दोन किंवा अधिक ठिकाणी नोंद असल्याचा संशय.

४. डेड (Dead): संबंधित मतदाराचा मृत्यू झाला आहे.

५. आदर्स (Others): इतर तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे नोंद अपूर्ण किंवा संशयास्पद आहे.

या ५ श्रेणीत नाव आले म्हणजे नाव रद्द झाले असे नाही; ही केवळ पडताळणीची प्रक्रिया आहे.

मतदार यादीत नाव कसे तपासावे?

पायरी १: सर्वप्रथम आपला विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राचा भाग क्रमांक माहित करून घ्या.

पायरी २: कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या ASDDO पोर्टलला भेट द्या.

पायरी ३: संबंधित विधानसभा मतदारसंघ व भाग क्रमांकानुसार उपलब्ध असलेली PDF फाईल उघडून आपले नाव तपासा.

नाव चुकीच्या श्रेणीत आल्यास काय करावे?

जर तुमचे नाव चुकीने वरील ५ श्रेणींपैकी एका श्रेणीत आले असेल, तर:

१. तातडीने आपल्या क्षेत्रातील बीएलओ (BLO - Booth Level Officer) शी संपर्क साधा. (Karnataka SIR Voter List Check Online)

२. तुम्ही संबंधित पत्त्यावरच राहत असल्याचे किंवा नोंद चुकीची असल्याचे वैध पुरावे/कागदपत्रे बीएलओकडे सादर करा. (Karnataka SIR Voter List Check Online)

३. बीएलओकडून मिळणारा गणती अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा. पडताळणीनंतर तुमची मतदार यादीतील नोंद दुरुस्त केली जाईल. (Karnataka SIR Voter List Check Online)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर