शेख हसीना यांच्या व्हर्च्युअल भाषणानंतर काही तासांतच बांगलादेशात राजकीय तणाव; माजी क्रिकेटपटू शाकिब अल हसन यांच्या घरावर हल्ला

 
Shakib Al Hasan House Attack
 
ढाका (Shakib Al Hasan House Attack) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेनंतर काही तासांतच माजी क्रिकेटपटू आणि आवामी लीगचे माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या मागुरा येथील घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी दगडफेक करून घराच्या खिडक्यांची तोडफोड केली तसेच पेट्रोल भरलेल्या बाटल्यां फेकून घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या हल्ल्यामुळे बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Shakib Al Hasan House Attack)
 
 
 
शेख हसीना यांचे दोन वर्षांनंतर व्हर्च्युअल संबोधन!
 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजून ४५ मिनीटांनी व्हर्च्युअल माध्यमातून देशाला संबोधित केले. जवळपास २५ मिनिटांच्या या भाषणादरम्यान त्यांचा कॅमेरा बंद होता. या कार्यक्रमात शेख हसीना यांचा मुलगा साजीब वाजेद जॉय यांच्यासह बांगलादेशचे मेहिबुल हसन चौधरी उपस्थित असल्याचे सांगितले जाते. शाकिब अल हसनही या व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी होते, मात्र त्यांनी कोणतेही भाषण केले नाही. (Shakib Al Hasan House Attack)
 
शाकिब यांच्या घरावर कसा झाला हल्ला?
 
मागुरा शहरातील शाकिब अल हसन यांच्या घरावर रात्री सुमारे ८:४५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांची तोडफोड झाली. यानंतर घराला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
हल्ल्याच्या वेळी शाकिब अल हसन बांगलादेशात नव्हते. वृत्तानुसार, ते श्रीलंकेत क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमासाठी गेले होते. गेल्या काही काळापासून ते आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहत असून जगभरातील विविध फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहेत. (Shakib Al Hasan House Attack)
 
क्रिकेटमधून राजकारणात प्रवेश
 
जानेवारी २०२४ मध्ये शाकिब अल हसन यांनी आवामी लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवून खासदारपद मिळवले. खासदार झाल्यानंतरही त्यांनी क्रिकेटमधील कारकीर्द सुरू ठेवली. मात्र, विद्यार्थी आंदोलनादरम्यान सरकारच्या समर्थनार्थ किंवा विरोधात कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
 
२०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू झालेले विद्यार्थी आंदोलन पुढे सरकारविरोधी व्यापक आंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकार सत्तेवरून पायउतार झाले. त्यानंतर आवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर, कार्यालयांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या. शाकिब यांच्या मागुरा येथील घरालाही यापूर्वी लक्ष्य करण्यात आले होते. (Shakib Al Hasan House Attack)
  
शाकिब अल हसन यांच्यावरील गुन्हे
 
सरकार बदलल्यानंतर शाकिब अल हसन यांच्यावर खून, अपहार, फसवणूक आणि मनी लाँडरिंगसह अनेक आरोपांखाली तपास सुरू करण्यात आला. सर्वाधिक चर्चेत आलेले प्रकरण विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोहम्मद रुबेल या वस्त्र कारखान्यातील कामगाराच्या मृत्यूशी संबंधित आहे.
 
रुबेल यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत शेख हसीना, शाकिब अल हसन आणि १५६ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार आंदोलकांवर झालेल्या गोळीबारासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले गेले आहे. (Shakib Al Hasan House Attack)
 
शाकिब अल हसन यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत म्हणाले की, संबंधित घटनेच्या वेळी ते बांगलादेशात नव्हते, त्यामुळे त्या घटनेशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
 
त्यांनी असेही सांगितले की, चौकशीच्या नावाखाली त्यांचे बँक खाते जवळपास दोन वर्षांपासून गोठवण्यात आले असून, अद्याप त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. (Shakib Al Hasan House Attack)
 
आवामी लीगच्या नेत्यांविरोधातील हिंसाचार सुरूच
 
शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशभर आवामी लीगच्या नेते, माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. अनेक ठिकाणी घरे, पक्ष कार्यालये आणि व्यावसायिक मालमत्तेची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. काही नेत्यांना अटक करण्यात आली, अनेक नेते देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक झाले.
 
शाकिब अल हसन यांच्या घरावरील हल्ला हा केवळ एका माजी क्रिकेटपटूच्या घरावर झालेला हल्ला नसून, बांगलादेशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेचे प्रतीक मानला जात आहे. देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आवामी लीगशी संबंधित नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Shakib Al Hasan House Attack)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर