'माझा मित्र राज्याचा मुख्यमंत्री झालाय याचा अभिमान!'; आर. माधवनकडून तमिळनाडूच्या राजकारणावर भाष्य, स्वतःच्या राजकीय प्रवेशाबाबत...


चेन्नई: (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay) दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'GDN' या तमिळ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्याने तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि अभिनेते जोसेफ विजय यांच्या राजकीय प्रवासावर आणि तमिळनाडूतील राजकीय बदलांवर मोकळेपणाने भाष्य केले. "माझा मित्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा मला अत्यंत अभिमान आहे," असे सांगत माधवनने स्वतः राजकारणात प्रवेश करणार की नाही, यावरही आपले मत स्पष्ट केले. (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)

'बदल घडू शकतो हा विश्वास मिळाला'- माधवन

प्रसिद्ध दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांनी 'GDN' चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त माधवनची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तमिळनाडूच्या बदलत्या राजकारणावर बोलताना माधवन म्हणाले, "तमिळनाडूत सध्या अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. राजकीय पटलावर इतक्या वेगाने झालेला बदल पाहून नक्कीच एक चांगला बदल घडू शकतो, असा विश्वास सर्वांना मिळाला आहे. मी विजयला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. 'माझा मित्र विजय आता राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे', हे मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो." (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)

मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक रविकुमार यांनी द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टालिन आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला असता, माधवनने आरोग्यदायी राजकारण आणि लोककल्याणालाच नेहमी प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)

स्वतःच्या राजकारण प्रवेशावर काय म्हणाले आर. माधवन?

चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्यांप्रमाणे "तुम्हीसुद्धा राजकारणात प्रवेश करणार का?" असा थेट प्रश्न विचारल्यावर माधवन यांनी त्वरित नकार दिला. "राजकारण ही दुधारी तलवार आहे. तुम्ही चांगले काम केले तरी लोक टीका करतात आणि चुका झाल्या तरी. तुम्ही काहीही केले तरी त्याला नकारात्मक दृष्टीने पाहणारा एक वर्ग असतोच. माझा राजकारणात येण्याचा अजिबात विचार नाही. राजकारणात येण्यासाठी जनसेवेची तीव्र भावना असावी लागते. लोकांचे नेतृत्व करावे किंवा मुख्यमंत्री व्हावे, अशी कोणतीही सत्तेची हाव माझ्या मनात नाही." (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)

"मला सुरुवातीपासूनच राजकारणाची तांत्रिक समज नाही. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीचा आदर करणे मी माझे कर्तव्य मानतो. मी मला शक्य असलेल्या मार्गाने समाजाचे भले करत राहीन." असेही ते म्हणाले. (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)

७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय 'GDN'

आर. माधवनचा आगामी तमिळ चित्रपट 'GDN' ७ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे महान शोधक, शास्त्रज्ञ आणि उद्योगपती गोपालस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या जीवनपटावर आधारित आहे. (R Madhavan On Tamil Nadu CM Joseph Vijay)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर