मुंबई : (Gulabrao Patil Kopargaon Water Scheme) "नागरिकांना शाश्वत व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावून ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांकडून घ्यावा. ज्या योजनांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव असतील ते प्राधान्याने पाठवावेत. ज्या योजनांचे काम मूळ अंदाजपत्रकानुसार पूर्ण झाले मात्र अतिरिक्त छोट्या रकमेची गरज आहे अशा पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्धतेबाबत प्रयत्न व्हावेत." असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवार दि.५ रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. (Gulabrao Patil Kopargaon Water Scheme)
या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक, जल जीवन मिशनच्या सह अभियान संचालक दिपाली देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Gulabrao Patil Kopargaon Water Scheme)
बैठकीत कोकमठाण ता. कोपरगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामास मंजूरी देणे, कोकमठाण ता. कोपरगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आवश्यक जागा संपादनासह मंजुरी देणे आणि माहेगाव देशमुख ता. कोपरगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव प्रस्तावास मंजूरी देणे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर व वारी कान्हेगाव तसेच राहाता तालुक्यातील रुई-शिंगवे, पुणतांबा व नपावाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे या विषयावर चर्चा करण्यात आली. (Gulabrao Patil Kopargaon Water Scheme)