पुणे (BARTI JEE NEET Coaching Scheme): नुकताच जी-नीटचा निकाल लागला. यामध्ये बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षापेक्षा खूपच कमी लागला. हे विद्यार्थी बार्टीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मोफत जी आणि नीट कोचिंग योजनेचे विद्यार्थी होते. या महत्त्वाकांक्षी योजनेवर शासनाने तब्बल २४ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र तरीही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे बार्टीच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.(BARTI JEE NEET Coaching Scheme)
बार्टीतर्पे २०२३-२०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यातील विविध विभागांतून ९०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, यातील केवळ ३५७ विद्यार्थी प्रत्यक्षात मुख्य परीक्षेला बसले. या परीक्षार्थींपैकी अवघ्या १७६ विद्यार्थ्यांना जेईई किंवा नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश आले. बार्टीच्या नुकत्याच पार पडलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, निवड झालेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेने हा एकूण निकाल अवघा १९.५५ टक्के इतकाच लागला आहे. दुसरीकडे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी निवडलेल्या काही खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट्सचा निकाल तर शून्य ते दोन टक्क्यांच्या घरात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे विविध विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.(BARTI JEE NEET Coaching Scheme)
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या आणि निकृष्ट निकाल देणार्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी या निकालाची गंभीर दखल घेतली आहे. मागील बॅचेसच्या निकालांची फेरतपासणी करण्यात येईल. तसेच भविष्यात कठोर नियम लागू केले णार आहेत. त्यानुसार, कोचिंग संस्थांच्या निवडीसाठी किमान ३० टक्के निकाल लागण्याची अट असणार आहे. तर निवड झालेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांची परीक्षेला अनिवार्य उपस्थिती यांसारख्या कडक निकषांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(BARTI JEE NEET Coaching Scheme)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.