ब्रँड व्हॅल्यूत आलिया भट्टची मोठी झेप; दीपिका, रश्मिका आणि रणबीर कपूर यांनाही टाकले मागे ....

 
alia bhatt
 
मुंबई: (Alia Bhatt Brand Value)बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर जाहिरात जगतातही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. क्रोलच्या नवीन 'सेलिब्रिटी ब्रांड व्हॅल्यूएशन रिपोर्ट २०२५' नुसार, आलिया भट्ट ही भारतातील सर्वात मूल्यवान महिला सेलिब्रिटी बनली आहे. ८९२ कोटी रुपयांच्या प्रचंड ब्रँड व्हॅल्यूसह तिने दीपिका पदुकोण आणि रश्मिका मंदाना यांसारख्या अव्वल अभिनेत्रींना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, तिने तिचा पती व अभिनेता रणबीर कपूरलाही या शर्यतीत मागे टाकले आहे (Alia Bhatt Brand Value)
 
आलियाच्या ब्रँड मूल्यामागील मुख्य कारणे ग्लोबल ब्रँड अँबेसेडर: (Alia Bhatt Brand Value)
 
आलियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर 'गुच्ची' सारख्या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँडची ब्रँड अँबेसेडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.यशस्वी व्यावसायिक: अभिनयाव्यतिरिक्त तिची लहान मुलांच्या कपड्यांची ही कंपनी आणि तिची प्रॉडक्शन हाऊस 'इटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स'मुळे तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे.सोशल मीडियावरील प्रभाव: इन्स्टाग्रामवर ८.५ कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेली आलिया जगातील सर्वाधिक प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. (Alia Bhatt Brand Value)
 
इतर अभिनेत्रींची कामगिरीदीपिका पदुकोण: (Alia Bhatt Brand Value)
 
दीपिका या यादीत सातव्या स्थानावर असून तिचे ब्रँड मूल्य ८४९.३५ कोटी रुपये आहे. रश्मिका मंदाना: 'नॅशनल क्रश' रश्मिकाने पॅन-इंडिया चित्रपटांमधील यश आणि 'स्वारोवस्की' सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबतच्या करारांमुळे १२ व्या स्थानावर मजल मारली आहे.अनन्या पांडे व जान्हवी कपूर: अनन्या पांडेने ६ क्रमांकांची मोठी झेप घेत १९ वे स्थान पटकावले आहे, तर जान्हवी कपूर ब्रँड व्हॅल्यूसह २३ व्या स्थानावर आहे. (Alia Bhatt Brand Value)
 
गेल्या काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीत चढ-उतार आले असले, तरी आलियाचा जागतिक प्रभाव आणि जाहिरात क्षेत्रातील मागणी यामुळे तिचे ब्रँड व्हॅल्यू सातत्याने वाढत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Alia Bhatt Brand Value)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर