मुंबई: (Sharvari wagh) बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या अभिनयातील प्रयोगांमुळे आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे विशेष चर्चेत आहे. अलीकडेच दिलेल्या एका सविस्तर मुलाखतीत तिने तिच्या चित्रपट निवडीचे गणित आणि बॉक्स ऑफिस कमाईबद्दलचे तिचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. चित्रपटाने १०० किंवा २०० कोटींची कमाई केली यापेक्षा प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेला आठवणीत ठेवणे हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले आहे. (Sharvari wagh )
कामाची पावती आणि प्रेक्षकांचे प्रेम: ( Sharvari wagh)
शर्वरी म्हणाली, "व्यावसायिक यश आणि बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी ही चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी खूप महत्त्वाची असते, हे मी नाकारत नाही. परंतु एक अभिनेत्री म्हणून, माझ्यासाठी खरी पावती ती असते जेव्हा प्रेक्षक मी साकारलेली व्यक्तीरेखा घेऊन थिएटरबाहेर पडतात. चित्रपटाने किती कोटी कमावले यापेक्षा प्रेक्षकांच्या मनात माझी भूमिका किती काळ टिकून राहिली, हे माझे खरे यश आहे.
तिने पुढे सांगितले की, "चित्रपटाचा व्यवसाय चांगला झाला की नव्या संधी मिळण्याचे रस्ते खुले होतात, हे खरे आहे. पण कलाकाराची ओळख ही त्याच्या अभिनयावरून निर्माण होते. मी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली, तरच माझे काम खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे मी मानेन." ( Sharvari wagh )
कमी कालावधीत 'मुंज्या 'महाराज'आणि 'वेदा' यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांतून शर्वरीने स्वतःला सिद्ध केले आहे. एकाच साच्यातील किंवा टाईपकास्ट भूमिका न करता, नवनवीन प्रयोग करण्यास आणि आव्हानात्मक व्यक्तीरेखा साकारण्यास आपले प्राधान्य असल्याचे तिने अधोरेखित केले.( Sharvari wagh )
अभिनयातील वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी ती येणाऱ्या काळातही वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे निवडत आहे. प्रेक्षकांनी तिच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांचे दडपण न घेता, प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न असेल, असेही ती म्हणाली. ( Sharvari wagh)
शर्वरीच्या या वक्तव्यातून तिच्यातील एका समजूतदार आणि परिपक्व कलाकाराची झलक पाहायला मिळते, जिचे लक्ष केवळ गल्ल्यावर नसून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यावर आहे. ( Sharvari wagh )