मुंबई : (Respected Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) "वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात दवाखान्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा नागरिकांना वेळेत व कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही." असे प्रतिपादन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार दि.४ रोजी केले.
धाराशिव येथील जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापना व उद्घाटन कार्यक्रमास दुरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून उपस्थित राहिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Respected Balasaheb Thackeray Aapla Dawakhana)
"जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, समन्वयपूर्ण आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.(Respected Balasaheb Thackeray Aapla Dawakhana)
आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक परिणामकारक करणे, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांतील समन्वय वाढविणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी आहे." असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.(Respected Balasaheb Thackeray Aapla Dawakhana)
समितीतील सर्व सदस्य, अधिकारी आणि संबंधित विभागांनी समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य करून धाराशिव जिल्ह्याला आरोग्य सेवांच्या क्षेत्रात राज्यातील आदर्श जिल्हा बनविण्याचे आवाहन यावेळी सरनाईक यांनी केले.(Respected Balasaheb Thackeray Aapla Dawakhana)