नवी दिल्ली: (Supreme Court Vehicle Insurance Rule) देशभरातील रस्त्यांवर धावणाऱ्या विनाविमा वाहनांच्या वाढत्या संख्येवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. ज्या वाहनांचा वैध विमा नसेल, त्यांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव न्यायालयाने केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. रस्ते अपघातातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वेळेत नुकसानभरपाई मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने विनाविमा वाहनांवर कारवाई करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांवर बसवलेल्या 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन' कॅमेऱ्यांद्वारे विनाविमा गाड्यांची ओळख पटवून थेट संगणकीय चलान फाडले जाईल. मोटार वाहन कायद्यानुसार पहिल्यांदा विनाविमा गाडी चालवल्यास २००० रुपये दंड किंवा ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास दंड ४००० रुपयांपर्यंत वाढेल. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
खंडपीठाने चिंता व्यक्त करताना सांगितले की, देशात तब्बल साडेसोळा कोटी (१६.५ कोटी) वाहने विनाविमा धावत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अपघात झाल्यास पीडितांना कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडावे लागते आणि आर्थिक मदत मिळण्यास प्रचंड विलंब होतो. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी विम्याचा कालावधी वाढवला
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने नवीन वाहनांच्या खरेदीच्या वेळी अनिवार्य विम्याच्या कालावधीत १ वर्षाची वाढ केली आहे. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
नवीन चारचाकी वाहने: आता सलग ४ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक असेल. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
नवीन दुचाकी वाहने: आता सलग ६ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक असेल. (Supreme Court Vehicle Insurance Rule)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.