मुंबई :(sunny deol) बॉलीवुड अभिनेता आणि माजी खासदार सनी देओल सध्या त्यांच्या आगामी 'बंटवारा १९४७' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. बिहारची राजधानी पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे .(sunny deol)
वडील धर्मेंद्र यांच्या विधानाचा संदर्भ
पत्रकार परिषदेत पाकिस्तानबाबत प्रश्न विचारला असता, सनी देओल यांनी आपले वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. सनी देओल म्हणाले, "आम्ही भावनांच्या गोष्टी करत नाही, कारण फाळणीपूर्वी संपूर्ण देश एकच होता. जसे माझे बाबा (धर्मेंद्र) म्हणायचे – 'भारत ही माझी आई आहे आणि पाकिस्तान माझी मावशी आहे'. आपण सर्व कुठेतरी एकमेकांशी जोडलेले आहोत. (sunny deol)
राजकीय वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न
चित्रपटाच्या शूटिंगबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तानमध्ये झाले नसून पूर्णपणे भारतातच झाले आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलणे टाळत ते पुढे म्हणाले, "आम्ही कलाकार आहोत, कथा निवडतो आणि त्या पडद्यावर मांडतो. आम्ही चित्रपटांना राजकीय वळण देत नाही आणि आम्हाला ते द्यायचेही नाही, त्यामुळे मी या विषयावर अधिक बोलणार नाही.(sunny deol)
सोशल मीडियावर ट्रोलिंग अन् बहिष्काराची मागणी
सनी देओल यांच्या या विधानाची क्लिप पसरताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या या भूमिकेवर टीका करत "चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हे विधान केले आहे" असा आरोप केला आहे, तर काही युझर्सनी चित्रपटावर बहिष्काराची मागणीही सुरू केली आहे. (sunny deol)
राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित 'बंटवारा १९४७' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत प्रीती जिंटा, करण देओल आणि अली फझल मुख्य भूमिकेत आहेत. (sunny deol)