मुंबई : (Sunil Tatkare) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अतिशय कार्यक्षमपणे कार्यभार सांभाळत असताना काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. सुनेत्रा वहिनींसंदर्भात केलेले वक्तव्य काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे द्योतक असून मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचा निषेध करतो. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी दिली.
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना खा. सुनिल तटकरे म्हणाले की, “काँग्रेसने टीका केली त्यामागचएकच कारण आहे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर दादांबद्दल असलेल्या भावना, दादांची प्रथम जयंती राज्यात पक्षापलीकडे जाऊन नागरिकांनी, शेतकऱ्यांनी साजरी केली.
आज वहिनी ज्या पद्धतीचे काम करताहेत त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशी टीका टिप्पणी करत राहणार. पण आम्ही आमचे काम करत राहू. काल रात्री उशिरा काँग्रेसने दिलगिरीचे टि्वट केले. महाराष्ट्रात संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधात जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पश्चाताप झाला असावा."(Sunil Tatkare)
राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही
संजय राऊतांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “राऊतांना हे माहित नाही की, सुनेत्रा वहिनी प्रशासनात प्रभावीपणे काम करत आहेत. त्या आपला विचार स्पष्टपणे मांडत असतात. अनेकवेळा त्यांचा पत्रकारांशीही संवाद होतो. त्यामुळे राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही."(Sunil Tatkare)
'ती' जबाबदारी प्रत्येकाचीच
वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार त्यांच्या बाजूला बसतात. त्यात काही चुकीचे नाही. पण पत्रकार परिषद ही त्या प्रमुख व्यक्तीची असते. अशावेळी बाजूला बसून पत्रकार परिषदेत भाग घेणे योग्य नाही. सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असून त्या प्रसारमाध्यमांसमोर त्या त्या विषयाची मांडणी समपर्क पद्धतीने करु शकतात, हा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे.(Sunil Tatkare)
बीडमध्ये घडलेल्या प्रसंगाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. पण एक संकेत नक्की आहे. ज्यावेळी मुख्य व्यक्तीचा पत्रकारांशी संवाद असतो, त्यावेळी बाजूला बसलेल्या व्यक्तीने तो संवाद मुख्य व्यक्तीनेच करावा, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. पत्रकार परिषद त्यांच्या नावनेच असते, त्यानेच बोलावे. त्याने संवाद करणे हा गाभा आहे. अशावेळी इतरांनी बोलणे अपेक्षित नाही. हे संकेत दोन्ही बाजूंनी आहेत. आमचे सहकारी याबाबत यापुढे जबाबदारीने वागतील," असेही सुनील तटकरे म्हणाले.(Sunil Tatkare)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....