मुंबई: (Pradeep singh rawat )भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते प्रदीप सिंह रावत यांचे मंगळवारी, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. ते गेल्या काही काळापासून ब्लड कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने हिंदी, तमिळ, तेलगू आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोकाकुल कळा पसरली आहे.
कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी (Pradeep singh rawat )
प्रदीप रावत यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी त्यांनी कर्करोगावर मात केली होती. मात्र, सुमारे दीड महिन्यापूर्वी कर्करोगाचा आजार पुन्हा बळावला, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि अचानक प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले असून, त्यानंतर ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Pradeep singh rawat )
'अश्वत्थामा' ते 'गजनी' (Pradeep singh rawat )
४० वर्षांची नेत्रदीपक कारकीर्दप्रदीप रावत यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या अतिशय लोकप्रिय 'महाभारत' या मालिकेतून केली होती, ज्यामध्ये त्यांनी 'अश्वत्थामा' ही भूमिका साकारून घराघरांत ओळख मिळवली. त्यानंतर त्यांनी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
'गजनी': तमिळ आणि हिंदी दोन्ही आवृत्तींमध्ये त्यांनी साकारलेली 'गजनी धर्मात्मा' ही मुख्य खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम व्हिलन्समध्ये त्यांच्या या भूमिकेची गणना केली जाते. (Pradeep singh rawat )
'लगान' : आशुतोष गोवारीकर यांच्या या ऑस्कर-नामांकित चित्रपटात त्यांनी 'देवा सिंग सोढी' नावाच्या देशभक्त आणि निष्ठावान सैनिकाची सकारात्मक भूमिका साकारली होती. (Pradeep singh rawat )
दाक्षिणात्य चित्रपट 'साय' 'भद्रा' :जगपती' यांसारख्या तेलगू आणि तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्यांनी काम केले. इतर चित्रपट: 'सरफरोश', 'ग्रँड मस्ती', आणि २०२५ मधील 'छावा' चित्रपटातही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. (Pradeep singh rawat )
चित्रपटसृष्टीतून त्यांच्या निधनाची (Pradeep singh rawat )
बातमी समजताच कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे:"आमचा 'गजनी' आणि 'लगान'चा 'देवा' प्रदीप रावत आता आपल्यात राहिला नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो." यशपाल शर्मा अभिनेता व 'लगान'मधील सहकलाकार अभिनेता सोनू सूदसह दाक्षिणात्य व बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीप सिंह रावत यांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. (Pradeep singh rawat )