इस्लामाबाद (Pakistan NOC for Foreign Journalists) : पाकिस्तान सरकारने परदेशी माध्यम संस्थांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या शहरांबाहेर रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकारांना सरकारकडून 'ना हरकत प्रमाणपत्र (NOC)' घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, देशात कार्यरत असलेल्या परदेशी माध्यम संस्था आणि त्यांच्यासाठी काम करत असलेल्या पत्रकारांच्या नोंदणी, मान्यता आणि कामकाजासाठी सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला आहे. (Pakistan NOC for Foreign Journalists)
काय आहेत नवीन नियम?
नवीन नियमांनुसार, पत्रकारांना इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमध्ये प्रवास करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याची आवश्यकता नाही. एबटाबाद आणि मरे येथील खाजगी प्रवासासाठी पत्रकार मंत्रालयाच्या बाह्य प्रसिद्धी विभागामार्फत (External Publicity Wing) ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. (Pakistan NOC for Foreign Journalists)
मिळालेल्या माहितीनूसार मंत्रालयाने म्हटले आहे की, "परदेशात राहणाऱ्या, परदेशी माध्यमांसाठी काम करणाऱ्या आणि नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांचे अर्ज ईपी विंग पोर्टलद्वारे सादर करणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी आपला अर्ज पाकिस्तानी मिशन, कॉन्सुलेट, उच्चायुक्तालय, समुपदेशक किंवा मंत्र्यांमार्फत अर्ज पाठवणे आवश्यक आहे." (Pakistan NOC for Foreign Journalists)
संस्थांनाही देण्यात आला इशारा!
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या सर्व समाज माध्यम संस्था, प्रॉडक्शन हाऊस आणि इतर संघटनांसाठी परदेशी माध्यमांना कोणत्याही प्रकारची मदत केल्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पब्लिसिटी विंगकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नोंदणीची ही अट पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अशा व्यक्तींनाही लागू होईल, जे पत्रकार नसले तरी परदेशी माध्यम संस्थांसाठी कार्यरत आहेत. हे नवे नियम सर्व आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांवर लागू असतील. यामध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांसह वेब-आधारित प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया संस्थांचाही समावेश आहे. (Pakistan NOC for Foreign Journalists)
नियमांनुसार, पाकिस्तानमध्ये परदेशी माध्यमांना सेवा देणाऱ्या प्रॉडक्शन हाऊस, मिडीया कंपनी, पत्रकार नसलेल्या व्यक्तींनाही मंत्रालयाकडे नोंदणी करणे आवश्यक असेल.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे, "ईपी विंगकडून आधीच मान्यता प्राप्त किंवा नोंदणीकृत सर्व आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना इस्लामाबाद, लाहोर आणि कराची वगळता इतर कोणत्याही शहरात अधिकृत कामासाठी जाऊन बातमी, स्टोरी, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया कंटेंट तयार करायचा असल्यास ईपी विंगकडून अनिवार्य 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घ्यावे लागेल." (Pakistan NOC for Foreign Journalists)
हे नवे नियम पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये स्थानिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या आंदोलन, गोंधळानंतर समाज माध्यमांच्या प्रवेशावर कडक देखरेख ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत. (Pakistan NOC for Foreign Journalists)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.