काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन; दुसऱ्या दिवशीही नोंदवला निषेध

    05-Aug-2026   
NCP Protest Silent Protest
 
मुंबई : (NCP Protest Silent Protest) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसने 'गुंगी गुडिया' असा उल्लेख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी हाताला काळ्या फिती लावून आणि संविधान हातात घेऊन मूक आंदोलन केले.(NCP Protest Silent Protest)
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. सना मलिक-शेख, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.(NCP Protest Silent Protest)
 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ दिलेल्या वेगेवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणला होता. तसेच आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणीही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.(NCP Protest Silent Protest)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर