मुंबई : (Lock up 2) ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो 'लॉक अप २' चा ग्रँड फिनाले आज, ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता पार पडत आहे. रितेश देशमुख आणि फराह खान यांच्या सूत्रसंचलनाखाली झालेल्या या शोचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lock up 2)
विजेतेपदाची शर्यत श्रेया कालरा की शिवांगी जोशी? (Lock up 2)
सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये विजेत्याच्या नावावरून प्रचंड उत्सुकता आणि मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरील काही लीक रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रेया कालरा हिने 'लॉक अप २' ची ट्रॉफी जिंकल्याचा दावा केला जात आहे. संपूर्ण सीझनमध्ये आपल्या आक्रमक आणि रणनीतीपूर्ण खेळीमुळे श्रेया चर्चेत राहिली होती. (Lock up 2)
दुसरीकडे, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी ही सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची आवडती आणि तगडी दावेदार मानली जात आहे. अनेक चाहत्यांच्या मते शिवांगीच या शोची खरी विजेती आहे. (Lock up 2)
नेटफ्लिक्स किंवा शोच्या निर्मात्यांकडून अद्याप विजेत्याच्या नावाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अंतिम निकाल आज रात्रीच्या एपिसोडमध्येच स्पष्ट होईल. (Lock up 2)
टॉप ५ फायनालिस्ट आणि बक्षीस रक्कम ग्रँड फिनालेमध्ये विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगत आहे. (Lock up 2)
शिवांगी जोशी
श्रेया कालरा
राम कपूर
शिल्पा शिंदे
योगेश रावत
'लॉक अप २' च्या विजेत्याला ₹१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि चमकदार ट्रॉफी मिळणार आहे. (Lock up 2)