देशात पुन्हा ‘जेन-झी’ आंदोलनाची धग; हेमंत सोरेन सरकारविरोधात हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन, CJPचा पाठिंबा, पण आंदोलनातील सहभागाबद्दल संभ्रम

 
Jharkhand Student Protest
 
रांची (Jharkhand Student Protest) : देशात सध्या आणखी एक विद्यार्थी आंदोलन चांगलेच पेटले आहे. हातात तिरंगा आणि 'We Want Justice'च्या घोषणा देत झारखंडमधील हजारो विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात बेमुदत उपोषण आणि आंदोलन सुरू केले आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर सुरू असलेल हे आंदोलन आता देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
 
मागील महिन्यात नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले होते. तसेच काही आंदोलन आता झारखंडमध्ये पहायला मिळत आहे, झारखंडमधील विद्यार्थ्यांचा संताप उसळला असून, या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. (Jharkhand Student Protest)
 
 
 
आंदोलनामागील कारण काय?
 
झारखंडमध्ये झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या भरती प्रक्रिया व स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि भरती प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांच्या आघाडी सरकारविरोधात आंदोलन करत असून, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करण्याची मागणी करत आहेत. (Jharkhand Student Protest)
 
रांचीतील विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे नेतृत्व देवेंद्रनाथ महतो करत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात जसे सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते, त्याचप्रमाणे रांचीमध्येही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी देवेंद्रनाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 
विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये १४ वी JPSC (झारखंड लोकसेवा आयोग) परीक्षा तातडीने रद्द करावी आणि भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, यांचा समावेश आहे. (Jharkhand Student Protest)
 
 
 
जस जसे आंदोलनला देशभरातून परिषद येत आहे तसे हेमंत सोरेन सरकारवरील राजकीय आणि प्रशासकीय दबावही वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनाला आता 'कॉकरोच जनता पार्टी' नेही पाठिंबा जाहीर केला आहे.
 
CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरूनही त्यांनी या आंदोलनाला अधिकृत समर्थन जाहीर केले आहे.
 
मात्र, आता CJP झारखंडमधील या आंदोलनात कितपत सक्रिय भूमिका घेणार, दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाप्रमाणेच झारखंडमध्येही CJP तितक्याच तीव्रतेने आंदोलन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jharkhand Student Protest)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर