मुंबई: (WGC Gold Price Prediction 2026) चालू वर्षात सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, जानेवारीतील उच्चांकावरून सोन्याच्या भावात आतापर्यंत सुमारे ३४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर १.४२ लाख रुपयांच्या आसपास आला आहे. मात्र, ही घसरण इथेच थांबणार नसून, सोन्याच्या किमतीत जानेवारी २०२६ मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत आणखी ३७ टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते, असा खळबळजनक अंदाज 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल' (WGC) ने आपल्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. (WGC Gold Price Prediction 2026)
WGC अहवालातील ६ अत्यंत महत्त्वाचे मुद्दे:
१. ३७% घसरणीची शक्यता: जानेवारी २०२६ मधील सर्वकालीन उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत ३७ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण होण्याचा अंदाज आहे. (WGC Gold Price Prediction 2026)
२. ३,८५७ डॉलरचा सपोर्ट ब्रेक: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ३,८५७ डॉलर प्रति औंस या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलच्या खाली गेल्यास मोठ्या घसरणीचा टप्पा सुरू होईल. (WGC Gold Price Prediction 2026)
३. पुढील मजबूत सपोर्ट: ३,८५७ डॉलरचा स्तर तुटल्यास सोन्याचा पुढील मजबूत सपोर्ट ३,५०० डॉलर प्रति औंस राहील. (WGC Gold Price Prediction 2026) ४. सर्वकालीन उच्चांक: जानेवारी २०२६ मध्ये सोन्याने ५,०७०.२१ डॉलर प्रति औंस हा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. (WGC Gold Price Prediction 2026)
५. ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून घसरण: ५ ऑगस्ट रोजी स्पॉट गोल्डचा भाव ५,५९५.५१ डॉलर या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून घसरून ४,१२७.९६ डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. (WGC Gold Price Prediction 2026)
६. LBMA ची आकडेवारी: 'लंडन बुलियन मार्केट असोसिएशन' नुसार यंदा सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ७.८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. (WGC Gold Price Prediction 2026)
डॉलर, जपानी येन आणि फेड रिझर्व्हचा प्रभाव
जर जपानी येन मजबूत झाला आणि अमेरिकी डॉलर कमकुवत झाला, तर सोन्याच्या किमतींना पुन्हा काही प्रमाणावर आधार मिळू शकतो. फेडने व्याजदर स्थिर ठेवल्यास सोन्याला दिलासा मिळेल, परंतु व्याजदर वाढवल्यास सोन्यावर अधिक दबाव येईल. (WGC Gold Price Prediction 2026)
इराण-अमेरिका संघर्ष ठरणार 'गेमचेंजर'
फेब्रुवारीपासून निर्माण झालेला इराण-अमेरिका संघर्ष आणि त्यामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा सोन्यावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता हा तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली असून, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत झाल्यास तेलाचे दर घसरतील. परिणामी महागाईवर नियंत्रण मिळवणे सोपे होऊन सोन्याच्या बाजाराला पुन्हा एकदा स्थिरता मिळू शकते. (WGC Gold Price Prediction 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.