डोंबिवली: (Satish Naikode) डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सतीश नायकोडे यांना शूटिंगसाठी दररोज मढ आयलंड, गोरेगाव किंवा बोरीवली येथे जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत असे. पहाटे साडेचारची लोकल पकडण्यापासून ते रात्री उशिरा घरी परतण्यापर्यंतच्या या त्रासामुळे आणि वेस्टर्न लाईनवर राहणे सोयीचे पडेल या विचाराने त्यांनी मुंबईच्या आरे किंवा गोरेगाव परिसरात घर घेण्याचे ठरवले.
शूटिंगसाठी प्रवासाचा त्रास अन् वेस्टर्न लाईनला घर घेण्याचा विचार (Satish Naikode)
डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सतीश नायकोडे यांना शूटिंगसाठी दररोज मढ आयलंड, गोरेगाव किंवा बोरीवली येथे जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत असे. पहाटे साडेचारची लोकल पकडण्यापासून ते रात्री उशिरा घरी परतण्यापर्यंतच्या या त्रासामुळे आणि वेस्टर्न लाईनवर राहणे सोयीचे पडेल या विचाराने त्यांनी मुंबईच्या आरे किंवा गोरेगाव परिसरात घर घेण्याचे ठरवले.
वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून २५ लाखांचे कर्ज (Satish Naikode)
२०१८ मध्ये त्यांनी घर घेण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून एका खाजगी फायनान्स कंपनीकडून २५ लाखांचे कर्ज घेतले आणि सुमारे २४.५ लाख रुपये संबंधित व्यक्तीला दिले. सर्व व्यवहार अधिकृत पद्धतीने होऊनही त्यांना घर मिळाले नाही आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेल्या साडेआठ वर्षांत त्यांनी कर्जापोटी ४५ लाख रुपये भरले असले, तरी अजूनही थकीत
रकमेचा डोंगर त्यांच्यावर आहे. (Satish Naikode)
न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे; मानसिक तणाव वाढला
आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर सतीश नायकोडे हे गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. या दुर्दैवी काळात आणि सततच्या मानसिक तणावामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले, तर स्वतः सतीश नायकोडे यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या संपूर्ण घटनेमुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (Satish Naikode)