'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ' उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार

Sunetra Pawar
 
मुंबई : (Sunetra Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी घोटाळ्याप्रकरणी पुरावे समोर आल्यास सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आरोपांवरही जोरदार पलटवार केला.
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "ज्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ' अशा पद्धतीचे त्यांचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारे राजकारण प्रथमच पाहायला मिळत आहे." (Sunetra Pawar)
 
एमपीएससी प्रकरणात चौकशीचे आश्वासन
 
एमपीएससी घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी संबंधित सादरीकरण पाहिलेले नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या आरोपांना एमपीएससीनेच उत्तर दिले आहे. आरोप उशिरा समोर आले असले तरी एमपीएससीने स्वतः पोलिसांत तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. (Sunetra Pawar)
 
मुंबई पोलीस फेक पोलिसांचे प्रकरण
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कथित घोटाळा २०२० सालातील असून त्यावर कारवाई सुरू आहे. ज्यांनी गैरप्रकार केले आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झाली आहे आणि पुढेही होईल. (Sunetra Pawar)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर