NEET आंदोलनानंतर 'झुरळ जनता पार्टी'चा आता E20 पेट्रोल धोरणाविरोध? छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक...


छत्रपती संभाजीनगर: (CJP E20 Petrol Protest) NEET-UG २०२६ पेपरफुटीविरोधात जंतर-मंतरवर भव्य आंदोलन उभारून तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरलेली 'झुरळ जनता पार्टी' (CJP) आता केंद्र सरकारच्या अनिवार्य E20 पेट्रोल धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी मंगळवारपासून दोन दिवसीय कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (CJP E20 Petrol Protest)

CJP चे संस्थापक अभिजित दीपके, प्रवक्ते सौरभ दास आणि कोअर कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या बैठकीत E20 इंधनाची सक्ती हा प्रमुख चर्चेचा विषय आहे. (CJP E20 Petrol Protest)

E20 मुळे मिळणारे कमी मायलेज, जुन्या वाहनांमधील इंजिन सुसंगततेच्या समस्या आणि पेट्रोल पंपांवर इतर इंधनांचा अभाव यावर देशभरात असंतोष वाढतो आहे. ग्राहकांना केवळ E20 पुरते मर्यादित न ठेवता शुद्ध पेट्रोल (E0), E10 आणि E20 यांपैकी निवड करण्याचा पर्याय दिला पाहिजे, या मागणीला CJP पाठिंबा देणार आहे. (CJP E20 Petrol Protest)

सोशल मीडियावर निवडणूक राजकारणात उतरण्याची मागणी होत असली तरी, CJP ने राजकीय पक्ष न बनता एक 'सशक्त लोकचळवळ व दबाव गट' म्हणूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला सध्या नव्या राजकीय पक्षापेक्षा धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. (CJP E20 Petrol Protest)

'NEET' नंतर पुढील रोडमॅप काय?

झारखंडसह विविध राज्यांत भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे. मागील आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या एफआयआर (FIR) प्रकरणी कायदेशीर रणनीती आखणे. तळागाळातील जाळे मजबूत करून राज्यस्तरीय युनिट्सना अधिक सक्षम करणे. (CJP E20 Petrol Protest)


दोन दिवसीय बैठकीच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत CJP कडून आगामी आंदोलनांची आणि E20 धोरणाविरोधातील भूमिकेची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. (CJP E20 Petrol Protest)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर