केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा जाहीर सत्कार संपन्न

    05-Aug-2026
CSMT Sawantwadi Express
 
मुंबई : (CSMT Sawantwadi Express) केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस सुरू करण्यास नुकतीच मंजुरी दिली.कोकण रेल्वे मार्गावर ही एक्सप्रेस नियमित धावणार असून २२ स्थानकांवर थांबणार आहे.
 
या नवीन एक्सप्रेसमुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून कोकणवासीयांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मंगळवार दि.४ रोजी शिवसेना पक्ष आणि कोकणवासियांच्या वतीने नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.(CSMT Sawantwadi Express)
 
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.(CSMT Sawantwadi Express)
 
 




संबंधित मजकूर