नवी दिल्ली: (WhatsApp Account In Review Problem) मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने भारत आणि जगभरातील हजारो वापरकर्त्यांची खाती कोणतीही पूर्वसूचना न देता २४ तासांसाठी पुनरावलोकनाखाली ठेवली असून, त्यांच्या मेसेजिंग आणि कॉलिंग सुविधा तात्पुरत्या ब्लॉक केल्या आहेत. सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे युजर्समध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या समस्येनंतर सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देत "कधीकधी आमच्याकडून चुका होतात आणि आम्ही ते लवकरच दुरुस्त करू," अशी कबुली दिली आहे. (WhatsApp Account In Review Problem)
स्क्रीनवर अचानक काय संदेश दिसला?
जेव्हा प्रभावित वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲप उघडले, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर पुढील मेसेज आला. "खाते पुनरावलोकनाखाली आहे. तुमची खात्याची हालचाल आणि डिव्हाइसची माहिती आमच्या सेवा अटींचे पालन करते की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तिचे पुनरावलोकन केले जात आहे." या मेसेजसोबतच २४ तासांचा टायमर सुरू झाला आणि युजर्सचे मेसेजिंग तसेच कॉलिंग पूर्णपणे ठप्प झाले. (WhatsApp Account In Review Problem)
ही समस्या कधी सुरू झाली आणि पूर्वसूचना दिली होती का?
सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार ८ वाजण्याच्या सुमारास ही समस्या उद्भवली. मेटा किंवा व्हॉट्सॲपने युजर्सना कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा दिला नव्हता. (WhatsApp Account In Review Problem)
व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही सेवेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि इतर युजर्सच्या सुरक्षेसाठी खाती बंद करत असतो. मात्र, कधीकधी सिस्टीमकडून चुका होतात. अशा वेळी खाती पूर्ववत करण्यासाठी आम्ही वेगाने काम करतो." (WhatsApp Account In Review Problem)
यावर आता युजर्सनी एक्स वर संताप व्यक्त केला आहे. अनेक अधिकृत आणि व्यावसायिक कामे व्हॉट्सॲपवर अवलंबून असलेल्या युजर्सचा मोठा खोळंबा झाला. (WhatsApp Account In Review Problem)
खाते पुनरावलोकनात (Review) गेल्यास काय करावे?
जर २४ तासांचा टायमर दिसत असेल तर कंपनीच्या स्वयंचलित चौकशीची वाट पाहावी लागेल. स्क्रीनवर दिलेल्या 'अपील' बटणावर क्लिक करून किंवा व्हॉट्सॲप सपोर्ट पेजला भेट देऊन तक्रार नोंदवा. तुम्ही सेवा अटींचे कोणतेही उल्लंघन केले नसेल, तर २४ तासांच्या आत तुमचे खाते आपोआप पूर्ववत (Restore) केले जाईल. (WhatsApp Account In Review Problem)
डाऊनडिटेक्टरवरही सर्व्हर डाऊनच्या तक्रारी
या घटनेसोबतच सोमवारी रात्री उशिरा भारत, अमेरिका आणि यूकेमध्ये व्हॉट्सॲपचे सर्व्हर डाऊन झाले होते. डाऊनडिटेक्टरनुसार युजर्सना फोटो, व्हिडिओ आणि स्टेटस अपडेट करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता सर्व सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्या आहेत. (WhatsApp Account In Review Problem)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.