मुंबई: (Salman Khan) बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील 'द अलायन्स' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला आपला धाकटा भाऊ सोहेल खान याला सरप्राईज देण्यासाठी सलमानने सेटवर खास हजेरी लावली. भावाची भेट घेताना आणि घरातील इतर स्पर्धकांशी संवाद साधताना सलमानने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाला म्हणजेच तुरुंगातील दिवसांना उजाळा दिला. (Salman Khan)
"लहान जागेत ७० लोक अन् एकच शौचालय..."
"शोमध्ये गप्पा मारताना सलमान खानने जोधपूर मध्यवर्ती तुरुंगातील आपल्या दिवसांची आठवण काढली. तो म्हणाला: "अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो, तेव्हा आमच्या समोर लोखंडी सळ्या असायच्या. एका अगदी लहानशा जागेत ५० ते ७० कैदी एकत्र राहायचे. संपूर्ण बॅरेकमध्ये फक्त एकच इंडियन-स्टाईल शौचालय असायचं. तिथे कधी पाल-सरडे असायचे आणि भीषण गोष्ट म्हणजे तिथे नेहमीच घाण साचलेली असायची."सलमानने ज्या साध्या आणि प्रामाणिकपणे हा अनुभव सांगितला, ते ऐकून सोहेल खानसह शोमधील सर्वच स्पर्धक अत्यंत भावूक झाले. (Salman Khan)
तुरुंगवासाची पार्श्वभूमी
१९९८ च्या प्रसिद्ध काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणामुळे सलमान खानला वेगवेगळ्या काळात सुमारे १८ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. आयुष्यातील या कठीण टप्प्याने आपल्याला खूप काही शिकवले आणि जमिनीवर ठेवायला मदत केली, असेही सलमानच्या संवादातून स्पष्ट झाले. (Salman Khan)