नवी दिल्ली: (Arvind Kejriwal PM Residence March E20) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या 'E20 पेट्रोल' (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणाविरोधात थेट पंतप्रधान निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. "भारत सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली हे धोरण स्वीकारले असून, यामुळे सामान्य वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे," असा घणाघाती आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. दुसरीकडे, भाजपने या मोर्चाला 'राजकीय स्टंट' आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत केजरीवालांवर जोरदार पलटवार केला आहे. (Arvind Kejriwal PM Residence March E20)
पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढताना पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले. भारताने अमेरिकेकडून इथेनॉल खरेदीसाठी ट्रम्प प्रशासनासमोर झुकणे पत्करले असून, केंद्र सरकार दबावाखाली E20 पेट्रोलच्या वापरावर अवाजवी भर देत आहे. E20 इंधनामुळे सामान्य नागरिकांच्या गाड्यांचे इंजिन खराब होत असून त्यांना विविध तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि E20 चे दर आणखी कमी केले पाहिजेत. (Arvind Kejriwal PM Residence March E20)
केजरीवालांच्या या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी पूर्वपरवानगी नाकारली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान निवासस्थान आणि परिसरातील सर्व प्रमुख मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा अडवून आंदोलकांना रोखले, ज्यानंतर आप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Arvind Kejriwal PM Residence March E20)