लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्येचे निधन

    04-Aug-2026
Annabhau Sathe Daughter
 
नालासोपारा : (Annabhau Sathe Daughter) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे २ ऑगस्ट रोजी पहाटे २.४५ वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक झाल्यानंतर गेले काही दिवस त्यांच्यावर या रुग्णालयातच उपचार होत होते. मात्र या प्रदिर्घ आजारात नालासोपारा येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
 
नालासोपारा येथे त्यांच्यापार्थिवावर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितच अंत्यसंस्कार झाले.त्यांच्या पश्चात संजय , राजेश, प्रशांत ही मुले, मुलगी नंदिनी आणि नातवंडे असा परिवार आहे.(Annabhau Sathe Daughter)
 
त्यांचा विवाह इस्लामपूर येथील अजित सपताल यांच्यासोबत कॉ. अण्णाभाऊ साठे यांनीच लावून दिला होता. अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कथा, कादंबर्‍याच्या त्या प्रथम वाचक होत्या. अण्णा भाऊंचे अक्षर समजायला अवघड असल्याने, त्यात त्या सुधारणा करीत असत. (Annabhau Sathe Daughter)
 
त्यांना स्वतः लाही लिखाणाची आणि साहित्याची आवड होती. अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर अण्णाभाऊंच्या अविस्मरणीय आठवणींचे लेखनही शकुंतलाबाई यांनी काही दिवाळी अंकात केले होते. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचे एक पुस्तकही शकुंतलाबाई आणि शांताबाई या मुलींना अर्पण केले आहे.(Annabhau Sathe Daughter)
 
 




संबंधित मजकूर