मुंबई: (Kushal Tandon) टीव्ही मनोरंजन विश्वात सध्या एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री आंचल खुराना हिने प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. एका जुन्या शोदरम्यान शिवांगीने तिला मेसेज करून स्वतःच्या बॉयफ्रेंडपासून लांब राहण्याचा इशारा दिला होता, असा आरोप आंचलने केला आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तो 'बॉयफ्रेंड' अभिनेता कुशल टंडन असावा असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. (Kushal Tandon)
नेमके प्रकरण काय आहे?
"काही वर्षांपूर्वी मी एका शोमध्ये काम करत होते. तेव्हा तिचा तथाकथित बॉयफ्रेंड त्या शोमध्ये आला होता. त्या वेळी शिवांगीने मला आणि माझ्या मित्राला एक मोठा मेसेज पाठवून तिच्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले होते आणि मी त्याच्याशी फ्लर्ट करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, तो मुलगा स्वतःच तिच्याशी प्रामाणिक नव्हता. मला त्या दोघांमध्ये'लॉक अप २' शोमधील हर्षद चोपडा आणि शिवांगी जोशी यांच्यातील प्रसंगावरून आंचलने एक व्हिडिओ शेअर करत तिचे मत मांडले. या व्हिडिओमध्ये आंचलने शिवांगीच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन इमेजमधील फरकावर भाष्य केले. रस नव्हता," असा थेट आरोप आंचलने केला. (Kushal Tandon)
सोशल मीडियावर कुशल टंडनच्या नावाची चर्चा
आंचलने आपल्या व्हिडिओत संबंधित अभिनेत्याच्या नावाचा थेट उल्लेख केला नव्हता. मात्र, शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी 'बरसाते - मौसम प्यार का' या मालिकेत एकत्र काम केले असून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळेच नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये तो बॉयफ्रेंड कुशल टंडनच असावा, असा कयास लावला आहे. आंचलने स्पष्ट केले की, शिवांगीचे चाहते तिला ट्रोल करत असल्यामुळेच तिला सत्य समोर आणावे लागले. शिवांगी कॅमेऱ्यासमोर फक्त चांगले राहण्याचे नाटक करते, असा टोलाही तिने लगावला आहे. (Kushal Tandon)