सोन्या-चांदीचे भाव ऐकून ग्राहक चक्रावले! किती आहे आज सोन्याचा भाव? जाणून घ्या


मुंबई: (Gold Silver Price Today) गेल्या काही दिवसांतील चढ-उतारानंतर आज, ४ ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) च्या आकडेवारीनुसार, १० ग्रॅम २४-कॅरेट सोन्याचा भाव ₹३८१ ने वाढून ₹१.४३ लाखांवर पोहोचला आहे, तर १ किलो चांदीचा भाव ₹२,१३० ने वाढून ₹२.१९ लाख झाला आहे. सणासुदीच्या तोंडावर दरात झालेली ही वाढ गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. (Gold Silver Price Today)

२०२६ मधील सोन्या-चांदीच्या दरांचा आलेख

२०२६ मध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. (Gold Silver Price Today)

सोन्यातील वाढ: ३१ डिसेंबर २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹१.३३ लाख होता. आतापर्यंत सोन्यात तब्बल ₹१०,००० ची वाढ झाली असून तो ₹१.४३ लाखांवर पोहोचला आहे. (Gold Silver Price Today)

चांदीतील घसरण:
३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदी ₹२.३० लाख प्रति किलो होती. यात आतापर्यंत ₹१२,००० ची घसरण झाली असून सध्याचा दर ₹२.१८ ते ₹२.१९ लाखांच्या आसपास आहे. (Gold Silver Price Today)

ऑल-टाईम हाय, चालू वर्षात २९ जानेवारी रोजी सोन्याने ₹१.७६ लाख तर चांदीने ₹३.८६ लाख असा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. (Gold Silver Price Today)

वर्षाखेरपर्यंत सोन्याचा भाव १.६० लाखांवर?

कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमती उच्चांकावरून सध्या चांगल्याच खाली आल्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव पुन्हा एकदा ₹१.६० लाख आणि चांदीचा भाव ₹२.८० लाखांपर्यंत पोहोचू शकतो. सध्याच्या दरावर गुंतवणूकदारांनी एकरकमी गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने (SIP पद्धतीने) गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Gold Silver Price Today)

प्रत्यक्ष सोने-चांदी खरेदी करण्याऐवजी ईटीएफद्वारे गुंतवणूक करणे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ हे बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतीवर आधारित असतात. यात प्रत्यक्ष सोने मिळत नाही, पण पैसे काढताना त्या वेळच्या चालू दरानुसार रक्कम मिळते. बीएसई आणि एनएसई वरून डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे तुम्ही अगदी ₹५०० पासून युनिट्स खरेदी करू शकता. ऑर्डर दिल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत (T+2) युनिट्स तुमच्या खात्यात जमा होतात. (Gold Silver Price Today)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर