मद्यप्रेमींसाठी मोठा धक्का! ५ लोकप्रिय ब्रँड्सच्या विक्रीवर FSSAI कडून बंदी; 'ही' ६ धक्कादायक कारणे आली समोर


नवी दिल्ली: (FSSAI Ban On Liquor Brands) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मद्य निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना आणि लोकप्रिय ब्रँड्सना मोठा दणका दिला आहे. ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू यांसारख्या अत्यंत लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या ठराविक प्रकारांवर FSSAI ने कारवाई केली आहे. नैसर्गिकरीत्या परिपक्व न करता कृत्रिम फ्लेवर्सचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप FSSAI ने केला आहे. (FSSAI Ban On Liquor Brands)

FSSAI ची कठोर कारवाई का? 'ही' ६ धक्कादायक कारणे समोर

१. दिशाभूल करणारी विक्री: बंदी घातलेली उत्पादने केवळ सुमार दर्जाची नसून ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याचा ठपका ठेवण्‍यात आला आहे. (FSSAI Ban On Liquor Brands)

२. मूळ घटकांचा अभाव: रम किंवा व्हिस्की मूळ नैसर्गिक घटकांपासून बनवण्याऐवजी बाह्य फ्लेवर टाकून तयार केली जात असल्याचे तपासात उघड झाले. (FSSAI Ban On Liquor Brands)

३. स्वादाशी छेडछाड: कृत्रिम किंवा "Nature Identical" फ्लेवरिंग टाकल्यामुळे मद्याचा मूळ गंध आणि नैसर्गिक चव नष्ट झाली आहे. (FSSAI Ban On Liquor Brands)

४. मॅच्युरेशन प्रक्रियेचा अभाव: मोलेससद्वारे रम किंवा माल्टद्वारे व्हिस्की नैसर्गिकरीत्या तयार करण्याऐवजी न्यूट्रल स्पिरिटमध्ये फ्लेवर मिसळून ती विकली जात होती. (FSSAI Ban On Liquor Brands)

५. लेबलिंगचे उल्लंघन: प्रॉडक्ट नेमके कशापासून बनवले आहे, याचा योग्य उल्लेख बाटलीवरील लेबल/स्टिकरवर केलेला नाही. (FSSAI Ban On Liquor Brands)

६. चुकीचे नाव: नियमबाह्यरीत्या तयार केलेल्या या उत्पादनांना व्हिस्की किंवा रम म्हणण्याऐवजी 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' किंवा 'व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट' म्हणून विकणे अनिवार्य आहे. (FSSAI Ban On Liquor Brands)

कोणत्या ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांवर बंदी?

ओल्ड मॉन्क: काही विशिष्ट व्हेरियंट्स (जसे की Old Monk XXX Rum / The Legend).

मॅकडॉवेल्स: बारामती व मध्य प्रदेश युनिटमधील उत्पादने.

बॅगपायपर: इनब्र्यू बेवरेजचे उत्पादन.

रॉयल चॅलेंज: युनायटेड स्पिरिट्सची काही उत्पादने.

अँटीक्विटी ब्ल्यू:
नियमबाह्य फ्लेवर वापरामुळे कारवाई.

मद्य कंपन्यांची भूमिका काय आहे?

या निर्णयानंतर संबंधित उत्पादनांची विक्री ठिकठिकाणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मात्र, संबंधित मद्य उत्पादक कंपन्यांनी नियमांचे योग्य पालन केल्याचा दावा केला असून, FSSAI च्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. हा वाद उत्पादनाच्या सुरक्षेशी संबंधित नसून नियमांच्या व्याख्येशी संबंधित असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. (FSSAI Ban On Liquor Brands)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर