ऑगस्ट महिन्याची सुरुवात धुवांधार पावसाने; बारवी धरणात 90 टक्क्यांहून जास्त पाणीसाठा

तर भातसाही 92 टक्क्यांवर

    04-Aug-2026
Barvi Dam Water Level
 
ठाणे : (Barvi Dam Water Level) ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाबत दिलासादायक चित्र समोर आले आहे. गेल्या २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली असून बारवी धोरणाने 90 टक्के पाणीसाठा झाला आहे तर जिल्ह्यातील सर्वात मोठे भातसा धारणात 92 टक्के पाणी साठा झाला आहे.
 
ठाणे जिल्हा व धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पातळी वाढली आहे. यामुळे दहागाव-बदलापूर रस्ता व रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून बारवी धरण 90 टक्के भरले आहे.(Barvi Dam Water Level)
 
ठाणे जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून जनजीवनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी १५.३१ मीटर इतकी नोंदवली गेली होती. पाण्याच्या या वाढत्या पातळीमुळे दहागाव ते बदलापूरकडे जाणारा बारवी नदीवरील पूल पाण्याखाली गेला हित त्यामुळे , सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.(Barvi Dam Water Level)
 
मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याचप्रमाणे, कल्याण तालुक्यातील टिटवाळा-फळेगाव रस्त्यावरील रुंदे पूल देखील सोमवारी पहाटे ५ वाजल्यापासून पाण्याखाली गेल्याने हा पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
 
बारवी धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या चांदप, पादीरपाडा, पिंपळोली, आसनोली, राहटोली, चोण, कारंद आणि सागाव या गावांना सतर्कतेचा इशारा तालुका बारावी धरणाचे उप अभियंता कार्यालयाने दिला आहे.(Barvi Dam Water Level)
बारवी धरणात सध्या 71.70 मीटर इतकी पाणी पातळी असून 72.60 मीटर हीओव्हरफ्लो मर्यादा आहे. सध्या 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. आत्तापर्यंत बारवी परिसरात 2160 मिमी पाउस झाल्याची नोंद आहे. धरणात 309.94 दशलक्ष घनमीटरइतका पाणीसाठा झाला आहे. 72.20 मीटर वर पाण्याची पातळी गेल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होणार आहे.(Barvi Dam Water Level)
 
 




संबंधित मजकूर