मुंबई: (Rashmika Mandana Injury) अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या आगामी 'म्हाइसा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. डान्स सिक्वेन्स शूट करत असताना तिची उजव्या नितंभातील टेंडन स्नायूंना हाडांशी जोडणारा धागा वेगळी झाली आहे. (Rashmika Mandana Injury)
नक्की काय घडलं?
रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या दुखापतीविषयी सविस्तर सांगितले, 'म्हाइसा' चित्रपटातील एका हाय-एनर्जी डान्स गाण्याच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. रश्मिकाने सांगितले की,
ही तिची एकापाठोपाठ झालेली सलग तिसरी दुखापत आहे. (Rashmika Mandana Injury)
"मी माझ्या शरीराला एखाद्या मशीनप्रमाणे न वागवता माणसासारखे वागवायला शिकले पाहिजे," असे तिने मजेशीर पण गंभीरपणे नमूद केले. (Rashmika Mandana Injury)
नितंभाच्या एका बाजूला चार टेंडन्स असतात जे पाय आणि नितंब जोडतात. त्यापैकी उजव्या बाजूचे एक टेंडन वेगळे झाले असून ते पुन्हा जोडले जाईपर्यंत पायाची हालचाल करणे कठीण जात असल्याचे तिने स्पष्ट केले. (Rashmika Mandana Injury)
सध्या डॉक्टरांनी रश्मिकाला काही आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा आणि वर्कआउटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
रश्मिकाने चाहत्यांना आश्वस्त करताना म्हटले की, "दुखापतीमुळे वेदना होत असल्या तरी त्या सहन करण्यापलीकडच्या नाहीत. देवाने मला सक्तीची सुट्टी दिली आहे असे मानून मी सध्या घरी कोडी सोडवण्यात आणि विश्रांती घेण्यात वेळ घालवत आहे." (Rashmika Mandana Injury)