मुंबई:( Madhuri Dixit )बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित पुन्हा एकदा तिच्या रिअल इस्टेट व्यवहारांमुळे चर्चेत आली आहे. माधुरीने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील आपली कमर्शियल ऑफिस स्पेस तब्बल ४.८५ कोटी रुपयांना विकली आहे. विशेष म्हणजे, माधुरीने ही मालमत्ता तिच्या मूळ खरेदी किमतीच्या तुलनेत जवळजवळ ९ पट अधिक किमतीत विकून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा नफा मिळवला आहे (.Madhuri Dixit)
व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे: (Madhuri Dixit)
अंधेरी पश्चिम, मुंबई अंधेरी हे मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र मानले जाते. (Madhuri Dixit)
विक्री किंमत: ₹४.८५ (Madhuri Dixit)
कोटी परतावा: खरेदी किमतीच्या तुलनेत सुमारे ९ पट अधिक मूल्य. (Madhuri Dixit)
मुंबई रिअल इस्टेटमधील वाढते आकर्षण
मुंबईतील अंधेरी, लोअर परळ आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स यांसारख्या भागांमधील कमर्शियल रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. माधुरीने केलेल्या या व्यवहारावरून मुंबईतील व्यावसायिक मालमत्तांमध्ये मिळणारा मोठा परतावा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ निवासीमालमत्तांमध्येच नव्हे, तर व्यावसायिक रिअल इस्टेटमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Madhuri Dixit)
दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा परतावा
रिअल इस्टेट डेटा विश्लेषक संस्था 'सीआरई मॅट्रिक्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक भाग मानला जातो. माधुरीने २००८ मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तब्बल १८ वर्षांनंतर मिळलेला हा मोठा नफा, मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद अधोरेखित करतो. (Madhuri Dixit)