वडार समाजाच्या प्रगतीसाठी संघटित ताकदीची गरज : विजय चौगुले

    31-Aug-2026   
Development of the Vadar community
 
मुंबई, (Development of the Vadar community): वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी समाजाने संघटित ताकद उभी करून आपल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विजय चौगुले यांनी केले. राज्य सरकारने वडार समाजासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून जाहीर केलेल्या विविध उपयोजना लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणीही त्यांनी केली. (Development of the Vadar community)
 
पिंपरी-चिंचवड येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने आयोजित वडार समाज संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविण्यासोबतच तरुण पिढीला शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज व्यक्त करण्यात आली. (Development of the Vadar community)
 
वडार समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद आणि विविध उपयोजना जाहीर केल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निधीचा प्रत्यक्ष लाभ गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे चौगुले यांनी सांगितले. शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून समाजातील कुटुंबांना स्थैर्य मिळवून देण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Development of the Vadar community)
 
यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रविभाऊ लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, हनुमंतराव अण्णा भोसले, मनोहर बंदपट्टे, विठ्ठलमामा मोरे यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्य करणारे मान्यवर, ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (Development of the Vadar community)
 
समाजातील तरुणांनी शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन पुढे यावे तसेच समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करावा, यावर मेळाव्यात भर देण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पिंटू जाधव यांच्यासह तरुण समाजबांधवांनी घेतलेल्या मेहनतीचे यावेळी कौतुक करण्यात आले. (Development of the Vadar community)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर