जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या विरोधात मोहित कंबोज यांचा कारवाईचा इशारा!

सोशल मीडियावरील बदनामीकारक मोहीम विरोधात मोहित कंबोज यांचा इशारा


Mohit Kamboj 

 
मुंबई (Mohit Kamboj Social Media Defamation) : मोहित कंबोज यांनी आपल्याविरोधात सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांवर जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण बदनामीकारक मोहीम राबवली जात असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपली सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने अप्रमाणित, दिशाभूल करणारे आणि खोटे दावे तसेच वृत्त प्रसारित केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी संबंधित व्यक्ती, माध्यमे आणि सोशल मीडिया हँडल्सना अशा प्रकारचे कृत्य तातडीने थांबवण्याचा इशारा दिला आहे. निराधार, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित पोस्ट, बातमी अथवा टिप्पणी प्रसारित केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mohit Kamboj Social Media Defamation)
 
आपल्याविरोधात सोशल मीडिया किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून करण्यात येणारी बदनामीकारक विधाने दिवाणी तसेच फौजदारी मानहानीच्या कायद्याच्या कक्षेत येऊ शकतात, असेही कंबोज यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांनी अशा प्रकारची माहिती तयार करणे, प्रकाशित करणे किंवा पुढे प्रसारित करणे तातडीने थांबवावे, असे आवाहन करत त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (Mohit Kamboj Social Media Defamation)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर