मुंबई (अभिनंदन परुळेकर) : Eknath Shinde Maratha community “मराठा समाजास न्याय देण्याच काम महायुती सरकार करत आहे.सत्तेत मराठा समाजाच्या नेत्यांच जेव्हा राज्यातील सत्तेत प्राबल्य होत तेव्हा निर्णय घेतले नाहीत. २०१४ नंतर ख-या अर्थान मराठा समाजास न्याय देण्यास सुरूवात झाली.सारथीसाठी निधी दिला, मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणास पाठवले.ओबीसींचा अधिकार कमी न करता त्यांच्या प्रमाणे सवलती दिल्या.आजचा मेळावा कुणाला आवाहन देण्याचा विषय नव्हता.गरीबास न्याय मिळाला पाहिजे ही आमची भुमिका आहे.कोणत्याही समाजाच्या आंदोलनाच्या विरूध्द आम्ही नाही आहोत. मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मला माहीत आहे.”असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. Eknath Shinde Maratha community
Eknath Shinde Live । परभणी शिवसेना पक्ष मेळावा तथा शेतकरी व युवा संवाद मेळावा - लाईव्ह https://t.co/9XecHTiP6c
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 30, 2026
परभणी येथे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी आयोजित शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते.आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपण सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा रद्द करावा अन्यथा मी स्वता सभास्थळी येणार अशी आक्रमक भूमिका घेतली होती त्यासाठी खासदार जाधव यांना त्यांनी दुरध्वनीवरून स्पष्टपणे तसे सांगितले देखील होते.त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. या सगळ्या घडामोडी सुरू असताना शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा देखील केली होती त्यानंतर त्यांनी मेळाव्याठीकाणी जाण्याची भूमिका बदलली. यानंतर मात्र मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही जरांगे पाटील समर्थक आंदोलकांनी मेळाव्याच्या ठीकाणी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली होती.त्यांना काही काळ भाषण थांबवत घोषणाबाजी करणा-यांना स्टेजवर येण्याचे आवाहन शिंदे यांनी केले होते. Eknath Shinde Maratha community
“या मेळाव्याची तयारी गेल्या दोन महिन्यापासुन चालू होती.फक्त तारीख पुढे गेली मनोज जरांगे पाटील मला काहीही बोलले तरी त्यांचा तो नैतिक अधिकार आहे."असे स्पष्टीकरण यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले. Eknath Shinde Maratha community