मुंबई (अभिनंदन परुळेकर) : BJP spokesperson Navnath Ban “परमपूज्य मोहनजी भागवत यांना अमेरिकेत बोलावल. भारतीय संस्कृती काय आहे हे ते जगाला सांगत आहेत. पण राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात.संजय राऊतांना पाकीस्तानात बोलावल जात कारण ते पाकीस्तान प्रेमी आहेत आणि ढोंगाच्या गप्पा राऊत यांनी करु नयेत. काऱण ढोंगी नंबर एक राहुल गांधी आहेत तर दुसरे ढोंगी संजय राऊत आहेत.”असा घणाघात भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर ऱविवार दि.३० रोजी केला.
“नेपाळ हिंदू राष्ट्र असल्याच संजय राऊत सांगतात पण हिंदूत्वाच्या गप्पा मारणारे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत मात्र लालबागध्ये गणपती आगमनावेळी घडलेल्या दुर्घटनेबद्दल,समाज कंटकानी केलेल्या गैरकृत्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत.नेपाळला मदत करण्यासाठी सरकार समर्थ आहे.” असेही बन म्हणाले. (BJP spokesperson Navnath Ban)
“देवेंद्र फडणवीस हे जनतेचे आणि लोकनेते आहेत.पण उध्दव ठाकरे खंडणीखोरांचे,वसुलीबहाद्दरांचे नेते आहेत.अशा टार्गेट मुळे तुमच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जाव लागल.पत्राचाळ घोटाळ्यात राऊत यांना १०० दीवस कारावास झाला.त्यामुळ देवाभाऊंवर टीका न करता मातोश्री २ कसे बांधले, स्वत्ताच्या सत्ता काळात मुंबई महापालिका कशी लुटली ते बघा.”असा प्रहार बन यांनी राऊतांवर केला. (BJP spokesperson Navnath Ban)
“जनाब संजय राऊत सिल्वर ओकची गुलामी करतात हे महाराष्ट्राला माहीत आहे.ऱाष्ट्रवादीच विलीनिकरण होऊ नये यासाठी संजय राऊत देखील प्रयत्नशील आहेत.कारण राऊत यांना उबाठा आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करायचा आहे.राहुल गांधींच्या नेतृत्वात शरद पवार,सुप्रिया सुळे,उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काम केल पाहीजे यासाठी संजय राऊत प्रयत्नशील आहेत.”असा आरोप बन यांनी केला.
“२०२६ साली तुमच्या छाताडावर जनता थयथया नाचली आणि तुम्हाला घरी बसवल.त्यामुळे कॉर्ट,निवडणूक आयोग यांच्या छाताडावर बसण्याच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नयेत.महाराष्ट्र चालवण्याची तुमची लायकी नाही आहे हे जनतेन तुम्हाला सांगितल आहे.महाराष्ट्र हा ख-या शिवसेनेचा,महायुतीचा आहे हे जनतेच्या न्यायालयात स्पष्ट झाले आहे.लोकशाहीत जनता सर्वोच्च असते त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे.याउलट अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है हा तुमचा मंत्र झाला आहे.”अशी टीका बन यांनी राऊत यांच्यावर केली. (BJP spokesperson Navnath Ban)