कोण आहेत प्रशांत किशोर? पंतप्रधान मोदींचे राजकीय रणनीतीकार ते बांकीपूर मतदारसंघाचे पक्षाचे पहिले आमदार, जाणून घ्या प्रशांत किशोर यांच्या राजकिय प्रवासाची कहाणी!

 
Prashant Kishor
 
पाटणा (Prashant Kishor) : बिहारच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ घडवत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता न आलेल्या जन सुराज पक्षासाठी हा पहिलाच मोठा निवडणूक विजय ठरला असून पक्षाला पहिला आमदार मिळाला आहे.
 
बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रिक्त झाली होती. नितीन नवीन यांनी या मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला होता, तर त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा यांनीही सलग चार वेळा पाटणा पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. (Prashant Kishor)
 
कोण आहेत प्रशांत किशोर?
 
राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर यांना 'पीके' या नावानेही ओळखले जाते. भारतीय राजकारणातील यशस्वी निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेच्या रणनीतीत प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत केंद्रातील काँग्रेस सरकारला सत्तेवरून पायउतार करत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी विविध राज्यांतील अनेक राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखत भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. (Prashant Kishor)
 
राजकारणात पूर्वीचे प्रशांत किशोर!
 
प्रशांत किशोर यांचा जन्म २० मार्च १९७७ रोजी बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील कोनार गावात झाला. त्यांचे वडील श्रीकांत पांडेय हे व्यवसायाने डॉक्टर होते, तर आई सुशीला पांडेय या गृहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमधील बक्सर येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते हैदराबाद येथे गेले. (Prashant Kishor)
 
प्रशांत किशोर यांनी लखनऊ विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA) पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, हिंदुजा रुग्णालय सहकार्याने त्यांनी एएससीआय (ASCI), हैदराबाद मधून हेल्थकेअर मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. (Prashant Kishor)
 
प्रशांत किशोर यांचा राजकारणातील प्रवेश !
 
राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी युनिसेफ (UNICEF) मध्ये काम केले. २०११ मध्ये त्यांनी भारतातील आर्थिक प्रगती आणि कुपोषण या विषयावर एक संशोधन अहवाल तयार केला होता. हा अहवाल तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला होता. (Prashant Kishor)
 
माध्यमांतील माहितीनुसार, याच अहवालामुळे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रशांत किशोर यांच्याकडे लक्ष गेले. त्यानंतर मोदी यांनी त्यांना भेटीसाठी आमंत्रित केले. या भेटीत प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या कल्पना आणि रणनीतीमुळे प्रभावित होऊन, नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या राजकीय रणनीतीकारांच्या टीममध्ये प्रशांत किशोर यांना सहभागी करून घेतले.
 
यानंतर २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. या यशानंतर त्यांची देशभरात निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख निर्माण झाली. (Prashant Kishor)
 
२०१४ लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाची भूमिका!
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी 'सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स (CAG)' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून भाजपसाठी 'चाय पे चर्चा' आणि '3D रॅली' यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रचार मोहिमा राबविण्यात आल्या. (Prashant Kishor)
 
या प्रचार रणनीतींनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात या रणनीतींचा महत्त्वाचा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखत भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले.

सक्रिय राजकारणात प्रशांत किशोर यांचा प्रवेश
 
निवडणूक रणनीतीकार म्हणून पडद्यामागे काम केल्यानंतर २०१८ मध्ये प्रशांत किशोर यांनी औपचारिकपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केला. दि. १६ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांनी जनता दल (युनायटेड) मध्ये प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, हा प्रवास फार काळ टिकला नाही. २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) या मुद्द्यावर नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. (Prashant Kishor)
 
बिहारमध्ये परतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी राज्यभर पदयात्रा काढत थेट जनतेशी संवाद साधला. या जनसंपर्क अभियानातून त्यांनी स्वतःचा राजकीय पाया मजबूत केला आणि पुढे 'जन सुराज' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
 
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाने अनेक उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. (Prashant Kishor)
 
बांकीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवत पक्षाचे पहिले आमदार म्हणून नवी ओळख
 
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे आमदार नितीन नवीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आल्याने बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. याच निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केली आणि जन सुराज पक्षाला पहिला मोठा राजकीय विजय मिळवून दिला. (Prashant Kishor)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर