मुंबई: (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement) बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान आपल्या खास शैली आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याचा भाऊ सोहैल खान याला पाठिंबा देण्यासाठी ‘अलायन्स’ या नव्या रिएलिटी शोच्या मंचावर पोहोचला आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, यात सलमानने अभिनेता रितेश देशमुख याच्यावर मारलेला मिश्किल टोला तुफान चर्चेत आला आहे. “रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे असं दिसतंय,” असे वक्तव्य सलमानने केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)
सलमान खानने नक्की काय म्हटले?
'अलायन्स' या शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान आपल्या नेहमीच्या 'दबंग' अंदाजात एण्ट्री करताना दिसतो. तिथे उपस्थित स्पर्धकांची भेट घेऊन आणि सोहैल खानची विचारपूस केल्यानंतर तो इतर स्पर्धकांशी गप्पा मारतो. याच दरम्यान, शोचा होस्ट कुणाल खेमू आणि मंचावरील वातावरणाचा संदर्भ देत सलमानने रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावर गंमतीने टिप्पणी केली. सलमानच्या या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)
'रितेशची नोकरी धोक्यात' का? काय आहे दोन्ही शोजचे कनेक्शन?
रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप २’या लोकप्रिय रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे, जो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)
दुसरीकडे, कुणाल खेमूच्या सूत्रसंचालनाखालील ‘अलायन्स’ हा शो अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)
दोन्ही शोज एकाच वेळी ओटीटीवर चर्चेत असल्याने, सलमानने मित्र रितेशच्या 'लॉक अप २' शोची आणि त्याच्या होस्टिंगची मिश्किलपणे टांग खेचल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)
सलमान-रितेशच्या खास मैत्रीची चर्चा
सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्यात कौटुंबिक आणि घट्ट मैत्रीचे नाते आहे. रितेशच्या ऐतिहासिक 'राजा शिवाजी' या चित्रपटात काम करण्यासाठी खुद्द सलमाननेच आग्रह धरला होता. या चित्रपटात सलमानने वीर 'जिवा महाला' यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता सलमानच्या या वक्तव्यावर चाहत्यांनी 'रितेश.. इट्स डन ब्रो' अशा कमेंट्स करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Salman Khan Riteish Deshmukh Job Statement)