मुंबई : (Navnath Ban On Uddhav Thackeray and Sanjay Raut) संजय राऊत, तुम्हाला आणि तुमचे मालक उद्धव ठाकरेंना यांना अभिजीत दिपकेमध्ये विष्णूचा अवतार दिसत असून याला मानसिक रुग्णावस्था म्हणतात. तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे आणि तुमचा उपचार महाराष्ट्रात होणार नसल्याने आम्ही वर्गणी काढून सिंगापूरच्या रुग्णालयात तुमच्यावर मानसिक उपचार करू, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "अभिजीत दिपकेची विष्णूच्या अवताराबरोबर तुलना करता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता यावरूनच तुमच्या गोळ्या संपल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात आले. महाराष्ट्रातील जनतेने पळवून लावल्याने तुमची पळता भुई थोडी झाली आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कलम ३७० हटवले. पळून जाणाऱ्यांमधले ते नाहीत. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघे पळपुटे आहेत. तुम्हाला वंदे मातरम् सक्तीचे विधेयक चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्याबाबत संसदेत कायदा पारित केला आणि आता तुमच्यासारख्या देशद्रोह्यांच्या बुडाला आग लागल्यानेच तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात."(Navnath Ban on Uddhav Thackeray and Sanjay Raut)
हिंदुत्वाचा लिलाव करून पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला
ते पुढे म्हणाले की, "मुळात संजय राऊत हे उबाठा गटाची जमीन भुसभुशीत करणारे गांडूळ आहेत. जयकुमार गोरे काय आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना चार वेळा जनतेने निवडून दिले आहे आणि तुम्हाला अजून भांडुपचा नगरसेवकही निवडून आणता आला नाही. गृहमंत्रालयाचा लिलाव करण्याची कुवत आणि वकूब तुमच्यात नाही. तुमच्या उबाठा गटाचाच लिलाव झाला आहे. स्वतःच्या खासदारकीचा आणि हिंदुत्वाचा लिलाव करून तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. आता या देशाचा लिलाव करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत आहात. परंतू, या देशातील तरुणाई आणि देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. तुमचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही."(Navnath Ban on Uddhav Thackeray and Sanjay Raut)
जेन झीशी तुम्हाला देणे-घेणे नाही
नवनाथ बन म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मनाने या तरुणांशी संवाद साधत सांगितले की, एखादा तरुण चुकला तर त्याला सोबत घेतले पाहिजे. आपल्याला देश पुढे न्यायचा आहे, भारताचे भविष्य घडवायचे आहे. सगळ्यांना सोबत येऊन देशासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या तरुणांचे नाते आजोबा आणि नातवाचे आहे. संजय राऊत मात्र कंसमामाप्रमाणे वागत आहेत. जेन झीशी तुम्हाला काहीही देणे-घेणे नाही. तुम्हाला फक्त तुमची राजकीय पोळी भाजायची आहे. स्वत:ची खासदारकी आणि भावाची आमदारकी टिकवायची आहे.(Navnath Ban on Uddhav Thackeray and Sanjay Raut)
पंतप्रधान नरेंद्र मोदी या तरुणांसोबत आहेत. याच तरुणांच्या आशीर्वादाने २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, २०१९ आणि २०२४ ला पुन्हा सत्तेत आले. याच तरुणांच्या पाठिंब्यामुळे २०२९ मध्येही ते पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मतांच्या माध्यमातून तुमच्या पक्षाचा वध करण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने याआधी केले आहे आणि २०२९ मध्येही तुम्हाला घरी बसवले जाईल," अशी टीकाही त्यांनी केली.(Navnath Ban on Uddhav Thackeray and Sanjay Raut)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....