मुंबई : (Nana Patole) काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त दुधाने पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओवरून नाना पटोले यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.
या व्हिडीओमध्ये दोन कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाद्यपूजन करताना दिसतात. तसेच, नाना पटोलेंवर फुलांचा वर्षावही करता दिसतात. या प्रकरणावरून सगळीकडे टीकेची झोड उठली असताना व्हिडीओतील पाय धुणाऱ्या व्यक्तींनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत टीकेला उत्तर दिले आहे. “नाना पटोले हे माझे गुरु असून मी त्यांचे गुरूपूजन केले आहे. त्यामुळे काहीह वादग्रस्त मला वाटत नाही," असे ते कार्यकर्ते म्हणाले.(Nana Patole)
"काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार, संस्कृती तशीच आहे. आपण काय करतो? कशासाठी करतो? यातून त्यांनी बोध घ्यायला हवा. अशाने समाजाकडून तुमच्यावर टीकाच होणार आहे. त्यामुळे असे प्रयत्न करू नये."(Nana Patole)
- महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
"कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजन करून घेणारे नाना पटोले राजकारणी आहेत की संन्यासी? हे त्यांनी जनतेला सांगावे. कार्यकर्ता गुलाम नाही. पाय धुवून घेण्याच्या प्रकाराबद्दल नाना पटोलेंनी जाहीर माफी मागावी. मोदीजी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात, नाना पटोले स्वतःचे पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेतात हीच संस्कारांमधली तफावत आहे. दुधाने पायांचा अभिषेक करून घेणे ही कार्यकर्त्यांची सेवा नव्हे तर, सरंजामशाही मानसिकता आहे."(Nana Patole)
- नवनाथ बन, भाजप मुख्य प्रवक्ते
"महाराष्ट्रात आता नविन भोंदू बाबाची एण्ट्री. भोंदू नाना पटोले. एकीकडे देव-धर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे, कार्यकर्त्यांकडून स्वत:चेच पाय धुवून घ्यायचे, यातून काँग्रेसच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते. हे लोकं महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वत:चे गुलाम समजतात, हे यातून सिद्ध होते."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....